आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी मराठा मंडळ मध्ये साजरा केला शिक्षक दिन!

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षण समितीचे संचालक उद्योजक रणजित देसाई यांच्या हस्ते करण्यात आले!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (5)

भारताचे पहिले उपराष्ट्रपती व द्वितीय राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा संपूर्ण देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. निपाणी मराठा मंडळ संचलित, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षण समितीचे संचालक उद्योजक रणजित देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. रणजीत देसाई यांनी सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ तसेच वही पेन देऊन सत्कार केला. तसेच आपल्या मनोगता मध्ये शिक्षक हे पिढी घडवत असतात समाजामध्ये सर्वात जर आदर्श काम कोण करत असेल तर ते शिक्षक करतात शिक्षकांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्राबद्दल शिक्षक वक्ता म्हणून एम ए. यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या मध्ये इयत्ता दहावी मधून आर्या कुलकर्णी, सुकन्या वाडकर, प्रज्ञा कराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक दिनानिमित्त बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका साकारून विविध विषयाचे अध्यापन केले. तसेच गुरुप्रती असणारी आत्मीयता विद्यार्थ्यांनी नाटकांमधून सादर केली. मोठ्या उत्साहाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला.  

या कार्यक्रमासाठी उपस्थित मुख्याध्यापक श्री डी डी हळवणकर, प्राथमिक मुख्याध्यापक बी आर मोहिते, प्राथमिक मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, ज्येष्ठ शिक्षिका व्ही.व्ही पत्की, एच डी साखळकर, जे आर खपले, के एल कांबळे, के एस देसाई, आय एस जबडे, यु एम यादव, लेखनिक मुकुंद कोरे, एस एस पाटील, जी एस पाटील, पी एस घाटगे, एस बी कांबळे, व्ही एस बुरुड,जे पी ढंगे, एस एस मोरे, एम ए चव्हाण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी वैष्णवी कदम हिने केले. कार्यक्रमाचा समारोप एन. टी खराडे यांनी केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!