आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

नियमाप्रमाणे आमदार साहेबांची जिभ पुरती घसरली!

नेहमी प्रमाणे सर्वत्र चर्चेचे गुऱ्हाळ, परिणाम मात्र शून्यच!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (5)

सध्या राजकारणी माणसांचा सर्वच राज्यांमध्ये सर्वतोपरी सर्व क्षेत्रांमध्ये तोल ढासळत असून लोकशाहीच्या दृष्टीने ही गोष्ट कोणतेही प्रकारे आमान्यच होणारे आहे. सर्वत्र विरोधी पक्षात असताना त्या नेत्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करायची. आणि तोच राजकारणी आपल्या पक्षात आल्यानंतर त्याला पावण करून घ्यायचे ही संस्कृती सध्या सर्वत्र बाळसे धरत असुन हे मुळीच हितावह नाही. असाच काहीसा प्रकार कागवाड मतदारसंघात घडला आहे. वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणारे कागवाडचे आमदार राजू कागे यांची जीभ पुन्हा घसरली असून. माजी मंत्री श्रीमंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत सार्वजनिक सभेत अश्लील भाषा वापरून आ. कागे यांनी पुन्हा आपली वैचारिक पातळी दाखवून दिली आहे.

शिरगुप्पी येथील काहींनी नुकताच भाजप प्रवेश केला. माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला. यावेळी भाषणात श्रीमंत पाटील यांनी कागवाड मतदार संघाचा विकास रखडला आहे. आपल्या काळात 3 हजार कोटींची विकासकामे मतदार संघात आणली होती. यापैकी काही कामे शिल्लक होती. त्याच्या निविदा निघून कामे सुरू होणे बाकी असताना निवडणूक लागली. यामध्ये आपण निवडून न आल्याने कामे रेंगाळली. परंतु, ही कामे पुढे नेण्याची गरज असताना सध्या प्रत्येक कामात राजकारण होत आहे. खिळेगाव- बसवेश्वर पाणी पुरवठा योजना देखील सुरू होण्याच्या मार्गावर असताना ती देखील बंद पाडली आहे. सर्वच कामे बंद पाडून फक्त भ्रष्टाचाराला खतपाणी दिले जात असल्याचा आरोप त्यांनी कोणाचेही नाव न घेता केला.श्रीमंत पाटील जे काही बोलले ते विषयाला धरून व कागवाड मतदार संघात नेमके काय चालले आहे, याबाबतच बोलले होते.

दरम्यान, याला प्रत्युत्तर देताना आ. कागे यांनी आपली हद्दच सोडली. माझ्या नादाला लागू नकोस, असे म्हणत त्यांनी अश्लील अन् शिवराळ भाषा वापरली. लोकप्रतिनिधी म्हणून समाजात वावरताना आपली भाषा सभ्य अन् सुसंस्कृत हवी. परंतु, आमदार असल्याचे विसरून कागे यांची जीभ घसरली व ते काहीही बरळले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मतदार संघातील जनतेतून राजकीय नेते कोणत्या थराला जाऊन टीका करत आहेत व घसरलेल्या पातळीची जोरदार चर्चा सुरू आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!