आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

देवचंद कॉलेजमध्ये 1974 ते 1976 मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (5)

देवचंद महाविद्यालयात रविवार दि. 1 सप्टेंबर रोजी 1974 ते 1976 सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक ॲडवोकेट अशोक रणदिवे यांनी केले. यावेळी उपस्थित माजी प्राचार्या डॉ. कमल हर्डीकर, माजी प्राचार्य श्री कीर्तिकुमार दड्डी , प्रा. बाळासाहेब इंगळे ,श्री बळीराम बारडे ,श्री शंकर चव्हाण ,श्री बंडू गुरव ,श्री रतनलाल कोठारी , श्री प्रकाश बाडकर , श्री दत्ता घोडके , श्री आप्पासाहेब चिककोडे यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच श्री काडसिद्धेश्वर हायस्कूलचे अध्यक्ष श्री अजितराव पाटील बेनाडीकर यांच्यातर्फे देखील सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो डॉ जी डी इंगळे  होत्या. त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय प्रति असणारे प्रेम ,आदर व आपुलकी पाहून त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले व आभार मानले .तसेच महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा त्यांनी याप्रसंगी सादर केला . याप्रसंगी माजी विद्यार्थी पुष्पा मोरे इचलकरंजी , अशोक पाटील चिखलवाळ, ॲडवोकेट रमेश देसाई, अब्दुल वहाब देसाई, सुरेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

मनोगतातून संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण देवचंदजी शाह, माजी अध्यक्ष श्रीमान किरणभाई शाह यांच्या योगदानामुळेच निपाणी परिसरातील अनेक गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले असे मत व्यक्त केले. तसेच विद्यमान अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह यांच्यामुळे आजही शिक्षणाची अनेक द्वारे या महाविद्यालयात उपलब्ध असल्याचे सांगितले. तर उपाध्यक्षा डॉ. प्रतिभा भाभी शाह व डॉ. सौ.तृप्ती भाभी शाह यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिल्याचे सांगितले.

सदर कार्यक्रमास सुभाष कुलकर्णी ,सुधीर कानिटकर पुणे ,आनंदा शेटके कासारी , बजरंग चौगुले चंदू पोकले , पी.टी. शाह तसेच इचलकरंजी व कोल्हापुर येथील अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते .सर्वांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे संयोजन ॲडवोकेट अशोक रणदिवे, विवेक पुरंदरे ,विजय चव्हाण ,केशव आलुरकर, बाबासाहेब ढेकळे, शेखर चिकोर्डे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केले व आभार डॉ.भारत पाटील यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!