आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

गजानन महाराज पुण्यतिथी निमित्त मराठा मंडळ सांस्कृतिक भवन निपाणी येथे पारायण समाप्ती!

श्री संत शिरोमणी गजानन महाराज शेगाव यांची 115 वी पुण्यतिथी निमित्त पारायण सोहळा!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (7)

श्री संत शिरोमणी गजानन महाराज शेगाव यांची 115 वी पुण्यतिथी निमित्त पारायण सोहळा आणि ग्रंथ वाचन मराठा मंडळ येथे सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 पासून दिनांक 8 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू होता याची समाप्ती व महाप्रसाद असा कार्यक्रम 8 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला होता.

सकाळी प्रारंभी सौ व श्री रणजीत प्रताप या दाम्पत्याच्या हस्ते श्री च्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला व त्यानंतर श्री संत शिरोमणी गजानन महाराज शेगाव भक्त मंडळ निपाणी चे अध्यक्ष श्री राजेश रघुनाथराव कदम आणि सौ. ज्योती राजेश कदम यांच्या हस्ते मराठा मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र रघुनाथराव कदम, सौ.संगीता रवींद्र कदम, माजी आमदार काकासाहेब पाटील , चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी आमदार सुभाष जोशी, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील ,संदीप चावरेकर, निपाणी मधील सर्व आजी-माजी नगरसेवक, मराठा मंडळ संचलित ,बालवाडी ,मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा , निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, मराठा मंडळ आय.टी.आय कॉलेज व मराठा मंडळ सांस्कृतिक भवन मधील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी , त्याचबरोबर निपाणी व निपाणी परिसरातील सर्व मान्यवरांच्या आणि भक्त मंडळींच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली व त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!