आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी मराठा मंडळाच्या विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने साजरा केला मंगळागौरीचा कार्यक्रम!

कार्यक्रमाचे उद्घाटन हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका व्ही व्ही पत्की यांनी केले!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी मराठा मंडळ संचलित, बालवाडी मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा, निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी या विद्यार्थिनींनी मंगळागौरीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला, मराठा मंडळ सांस्कृतिक भवन मध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका व्ही व्ही पत्की यांनी केले.

पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून मुलींनी अतिशय सुंदर पद्धतीने लोकगीते सादर केलीत. तसेच काही विद्यार्थिनींनी मंगळागौरीच्या गाण्यावरती आकर्षक असे नृत्य केले.

या कार्यक्रम प्रसंगी प्राथमिकचे मुख्याध्यापक बी आर मोहिते, प्राथमिक चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, हायस्कूलचे मुख्याध्यापक डी डी हळवणकर उपस्थित होते.

मुख्याध्यापक डी डी हळवणकर यांनी सांगितले की पारंपारिक सण हे साजरे झाले पाहिजेत आपली परंपरा आपण जपली पाहिजे. विशेष म्हणजे आज गौरी आगमन असताना सुद्धा आज विशेष करून मुलींनी आपली उपस्थिती 100% दर्शवली या बद्दल विद्यार्थिनींचे विशेष कौतुक मुख्याध्यापकांनी केले.

याप्रसंगी जी एस पाटील, पी एस घाटगे, एस बी कांबळे,जे पी ढंगे, एन टी खराडे, एस एस मोरे, एम ए चव्हाण. के एस देसाई , यु एम यादव इत्यादी शिक्षिका उपस्थित होत्या शिक्षिकांनी सुद्धा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!