आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी मराठा मंडळ मध्ये 15 सप्टेंबर एम विश्वेश्वरय्या जयंती आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा करण्यात आला!

Kiran G.Patil M.No.8884357516


15 सप्टेंबर एम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस हा अभियंता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रथम त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विश्वेश्वराय भारताचे प्रथम अभियंता व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती तसेच लोकशाही व लोकशाहीचे महत्त्व याची माहिती मुख्याध्यापक डी डी हळवणकर  यांनी विद्यार्थ्यांना दिली.

त्यानंतर मराठा मंडळाच्या आवारामध्ये मानवी साखळीद्वारे लोकशाही दिन साजरा करण्यात आला. याची सुरुवात नाडगीताने करण्यात आली. लोकशाहीचा विजय असो, लोकशाही चिरायु हो अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक बी आर मोहिते, प्राथमिक मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका व्ही.व्ही पत्की, एस डी साखळकर, जे आर खपले, ए एम यादव, के एल कांबळे, के एस देसाई, आय एस जबडे, यु एम यादव, लेखनिक मुकुंद कोरे. प्राथमिक चे एस एस पाटील, जी एस पाटील, पी एस घाटगे, एस बी कांबळे, व्ही एस बुरुड,जे पी ढंगे, एन टी खराडे, एस एस मोरे, एम ए चव्हाण इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!