आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मराठा मंडळाचे विश्वस्त छानराव विष्णुपंत आंबले यांना मराठा मंडळ कडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली!

Kiran G.Patil M.No.8884357516


मराठा मंडळाचे विश्वस्त, तसेच माजी आमदार कै.रघुनाथराव कदम यांचे विश्वासू व्यक्ती छानराव विष्णुपंत आंबले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मराठा मंडळाचे अनेक वर्षे त्यांनी विश्वस्त म्हणून काम केले होते.

शिक्षण समितीचे चेअरमन श्री राजेश रघुनाथराव कदम यांनी श्रद्धांजली वाहत असताना सांगितले की, छानराव आंबले हे अतिशय प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे निपाणी भागातील व्यक्ती होते. तसेच दादांच्या बरोबर त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. ज्यावेळेला मराठा मंडळ ची स्थापना करण्यात आली त्यावेळेला दादांच्या सोबत असणारे एक विश्वस्त व त्या वेळेला संस्थेतील सिंहाचा वाटा असणारी व्यक्ती म्हणजेच छानराव आंबले होते. तसेच आपल्या बालपणीच्या आठवणी छानराव मामांच्या बरोबर घालवलेले दिवस या आठवणींना जड अंतकरणाने उजाळा दिला. त्यांनी अनेक वर्ष मराठा मंडळ संस्थेची सेवा केली. आम्ही आजन्म त्यांचे ऋणी राहू असे मनोगतात सांगितले.

मराठा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र रघुनाथराव कदम, माजी नगरसेवक संदीप चावरेकर, मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक डी डी हळवणकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक बी आर मोहिते, प्राथमिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, आय.टी.आय चे प्राचार्य एस आर कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी छानराव आंबले यांना श्रद्धांजली वाहिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!