आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

शिप्पूर येथील विघ्नहर्ता तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न!

या शिबिरात 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणून हेल्मेट, पाण्याची बोटल आणी बॅग या वस्तू देण्यात आल्या!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (15)

शिप्पूर येथील विघ्नहर्ता तरुण मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षा निमित्याने गणेश मंडळ व रोटरी क्लब निप्पाणी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

विघ्न्हार्ता तरुण मंडळाला पंचवीस वर्षांची परंपरा आहे.या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिराचे उदघाटन मंडळाचे अध्यक्ष व इतर सदस्याच्या उपस्थितीमध्ये उदघाटन झाले. या वेळी बुगटे आलुर येथील ग्रामीण सरकारी रुग्णाल्याचे वैद्यकीय अधिकारी संदीप पोवार, रोटरीचे डॉ. श्रीकांत कसोटे व त्यांचे सहकारी तसेच ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील, सदस्य दत्तात्रय खराडे, संजय कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट दिली. या शिबिरात 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणून हेल्मेट, पाण्याची बोटल आणी बॅग या वस्तू देण्यात आल्या. तसेच रक्तदान केल्यानंतर अल्पोपहाराची सोयही केली होती. हे शिबीर पार पाडण्यासाठी विघ्नहर्ता तरुण मंडळाचे  अध्यक्ष उपाध्यक्ष व  सदस्य व ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!