आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

शिप्पूर येथे वाचन दिन संपन्न!

या वेळी गावातील 78 लहान मोठे विध्यार्थी व मान्यवर वाचकांनी सहभाग नोंदवला.

Kiran Gopalrao Patil M,88884357516


शिप्पूर ता.हुक्केरी येथील सुरेश भाई शिपूरकर ट्रस्ट संचलित फुले,शाहू आंबेडकर वाचनालयाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या वेळी गावातील 78 लहान मोठे विध्यार्थी व मान्यवर वाचकांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन केले.स्वागत आणि प्रास्तविक वाचनालयाचे कार्यवाहक प्रा.संजय कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे महत्व आणि विशेष प्रा.नविजन कांबळे यांनी सांगितले. या वाचन प्रेरणा दिनानिमित्त अनेक पुस्तकांचे वाचन आणि मनन केले.या वेळी सुरेश भाई शिपुरकर ट्रस्ट संचलित फुले, शाहु, आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. मुकुंद कांबळे, उपाध्यक्ष प्रा.मंगलदास कांबळे, कार्याध्यक्ष भाऊराव कांबळे,खजिनदार प्रभाकर कांबळे, सदस्य विजय कांबळे, कमलाकर कांबळे, अशोक कांबळे, बाबुराव शिंदे, केशव शिंदे, विवेक कांबळे, आनंदा कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .शेवटी उपस्थितांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!