आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

सौ. भागीरथीबाई शाह कन्या शाळेतील विद्यार्थिनींचे प्रतिभा कारंजी स्पर्धेत यश!

संस्थेचे चेअरमन आशिषभाई शाह यांनी केले सर्वांचे अभिनंदन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (27)

दि. फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ.भागीरथीबाई शाह कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी झोनल पातळीवरील प्रतिभा कारंजी स्पर्धेत उज्वल यश संपादन केले. यामध्ये कुमारी समीक्षा संतोष शिंदे (मिमिक्री) प्रथम क्रमांक व अभिनय गीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक कुमारी अमृता अनिल नाईक क्ले मॉडेल प्रथम क्रमांक कुमारी वल्लरी अनिरुद्ध कुलकर्णी धार्मिक पठण प्रथम क्रमांक कुमारी अभिलाषा सनदी देशभक्तीपर गीत तृतीय क्रमांक कुमारी निधी संतोष सावंत आभूषण तृतीय क्रमांक प्राप्त केले.

तसेच गर्ल्स मराठी कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थिनी कुमारी शुभ्रा नाईक संस्कृत धार्मिक पठण व चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी शरयु सुतार धार्मिक पठन द्वितीय क्रमांक कुमारी तहूरा बागवान अरेबिक धार्मिक पठण प्रथम क्रमांक कुमारी विधी भोपळे कथाकथन प्रथम क्रमांक कुमारी संस्कृती वासुदेव देशभक्ती गीत गायन द्वितीय क्रमांक देशभक्ती गायन कुमारी श्रावणी कुंभार द्वितीय कुमारी अंकिता खवरे अभिनय गीत तृतीय कुमारी पृथ्वी सवदे भक्ती गीत द्वितीय क्रमांक कुमारी आरोही तेरदाळे मराठी कंठपाठ तृतीय क्रमांक प्राप्त केले. 

यापैकी प्रथम क्रमांक प्राप्त सर्व विद्यार्थिनींची तालुका पातळीवरील प्रतिभा कारंजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्वांचे संस्थेचे चेअरमन आशिषभाई शाह यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ एस. जी. पाटील श्री आर. पी. बामणे व सर्व शिक्षकांचे मोलाचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!