सौ.भागिरथीबाई शाह कन्याशाळेतील विद्यार्थिनींचे तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश!
दि. फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. भागिरथीबाई शाहू कन्याशाळेतील विद्यार्थिनींनी तालुका- स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उज्वल यश संपादन केले.
नुकत्याच निपाणी येथे तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत इशरा नासिर मकानदार हिने सुवर्णपदक, इकरा नासिर मकानदार – सुवर्णपदक, प्राजक्ता धर्मेंद्र पारील – सुवर्णपदक, श्रध्दा राम पोवार- सुवर्णपदक, श्रेया विशाल मोहिते सुवर्णपदक मिळविले तर काशी कुमार पुजारी व साक्षी कुमार पुजारी यांनी रौप्यपदक मिळविले यातील सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थिनींनी विविध विभागात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या सर्वांचे संस्थेचे चेअरमन आशिषभाई शाह यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व विद्यार्थिनींना शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सौ. एस जे. पाटील श्री.आर.पी. बामणे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.