आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी शहरात प्रथमच भव्य दांडिया आणि रास गरबा कार्यक्रम!

जेडी ग्रुप, रतुजा डेव्हलपर्स आणि प्रणाम इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स निपाणी येथे!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (30) 

नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो देवी दुर्गेच्या नवरूपांची उपासना करण्यासाठी साजरा केला जातो. याचा उगम देवीच्या महिषासुर राक्षसावर विजय मिळवल्याच्या कथेवर आधारित आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. या सणाचे ऐतिहासिक संदर्भ वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये आढळतात. नवरात्र विशेषतः शारदीय नवरात्र आणि वसंत नवरात्र अशा दोन प्रकारात साजरे केले जाते. या काळात भक्त उपवास, पूजा आणि आराधना करतात, ज्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.

या सणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी निपाणी शहरात प्रथमच भव्य दांडिया आणि रास गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून निपाणी  जेडी ग्रुप(रतुजा डेव्हलपर्स) आणि प्रणाम इव्हेंट्स यांच्यावतीने श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स जुना पीबी रोड निपाणी येथे प्रथमच भव्य दांडिया आणि रास गरबा कार्यक्रम गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री आठ ते 11 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एका व्यक्तीस 100 रुपये एका जोडीस 150 रुपये एका ग्रुप साठी म्हणजेच जास्तीत जास्त सहा व्यक्तींसाठी चारशे रुपये तर संपूर्ण नवरात्रीसाठी एका व्यक्तीस 600 रुपये असे चार्जेस असून पहिल्या दिवसासाठी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी खास ऑफर उपलब्ध आहे.

या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स येथे नवीनच चालू  झालेल्या “आरंभ”बँक्वेट हॉलचा व सुसज्ज लॉजिंग पार्किंगचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे. तसेच गरबा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस नवीनच चालू झालेल्या “सिल्वर स्पून” रेस्टॉरंट मध्ये प्रत्येक बिलाच्या पाठीमागे दहा टक्के ची सूट मिळेल.


 

 


या गरबा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क

8850479800               9834447071

7447217060               9620727007

9008414150

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!