आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

सैनिकी शाळेमध्ये आंतरशालेय वकृत्व स्पर्धा संपन्न!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (2)

कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्री मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने संकुलात आंतरशालेय वकृत्व स्पर्धा संस्थेचे सचिव कुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या . यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील , प्राचार्य अनमोल पाटील, मुख्याध्यापिका कोमल पाटील हे उपस्थित होते . प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक वर्षा कुलकर्णी यांनी केले . यानंतर प्रमुख मान्यवरांच्या अमृत हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले . नंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला . यानंतर विनोद परीट यांनी शिक्षक मनोगत व्यक्त करताना आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक उपक्रमांना महत्त्व दिले पाहिजे असे सांगितले. यानंतर प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यानंतर या स्पर्धेचे नियम व अटी अभिनय नाईक यांनी सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांच्या तज्ञ पर्यवेक्षकाखाली स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा 5वी ते 8वी व 9 वी ते 12 वी अशा दोन गटाद्वारे घेण्यात आल्या . या स्पर्धेकरिता कर्नाटक व महाराष्ट्र भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये 5वी ते 8वी या गटातून मांगुर हायस्कूल मांगुरची विद्यार्थिनी प्रतीक्षा पाटील हिचा प्रथम क्रमांक , तसेच एम एच पी एस लखनापूरची विद्यार्थिनी कोमल चव्हाण हिचा द्वितीय क्रमांक तसेच राजमाता गर्ल्स हायस्कूल सांगलीची विद्यार्थिनी ऋतुजा हजारे तसेच मराठी कॉमेंट स्कूल अक्कोळची विद्यार्थिनी श्रावणी रांगोळे या दोघांचा तृतीय क्रमांक तसेच जी एम संकपाळ हायस्कूल श्रीपेवाडीचा विद्यार्थी पारितोष पाटील याने उत्तेजनार्थ क्रमांक पाठविला आहे . तसेच 9 वी ते 12 वी या गटामध्ये श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल कनेरीची विद्यार्थिनी सलोनी कुरुंदवाडे हिचा प्रथम क्रमांक तर सरलादेवी यशवंत माने हायस्कूल कागलची विद्यार्थिनी श्रेया सौंदलगे हिचा द्वितीय क्रमांक तसेच देवचंद कॉलेज अर्जुननगरची विद्यार्थिनी मधुरा कुंभार हिचा तृतीय क्रमांक तर राधानगरी विद्यालय राधानगरीची विद्यार्थिनी श्रेया कांबळे हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे . या स्पर्धेचे परीक्षण अनिस मुल्ला , प्रज्ञा माने , तुषार पवार , डी एस नाईक यांनी केले .यावेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र , रोख रक्कम व पुष्प देऊन गौरविण्यात आले . तसेच सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले . विद्यार्थ्यांचा सर्वगुणसंपन्न विकास व्हावा व विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता ओळखता यावी यासाठी शालेय स्तरावर स्पर्धा घेणे आवश्यक असल्याचे मत सचिव कुमार पाटील यांनी व्यक्त केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेलेकर यांनी केले तर आभार वर्षा कांबळे यांनी मानले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!