आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करणे काळाची गरज- उपनिरीक्षक अनिता राठोड!

खटकलाट लक्ष्मी क्रॉस येथे हेल्मेट जनजागृती कार्यक्रम!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (2) खडकलाट 

निपाणी व चिकोडी तालुक्यामध्ये रस्त्याची दुरावस्था अतिशय खराब असल्याचे आपण नेहमीच पाहतो. त्यातच आज दिवसेंदिवस दुचाकी स्वारांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वेगावर नियंत्रण, वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट प्रदान करून वाहन चालवल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. मात्र पोलीस खात्याकडून दुचाकी स्वरामध्ये जनजागृती करूनही होत असलेले अपघातात हेल्मेट नसल्यामुळे दुचाकी स्वरांना प्राण गमावा लागत आहे वाहतूक नियमांचे पालन करून दुचाकी स्वराने हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन येथील पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक अनिता राठोड यांनी केले.

मंगळवार दिनांक 1 रोजी निपाणी चिकोडी मार्गावरील सात तोंडी लक्ष्मी क्रॉस येथे दुचाकी स्वारासाठी हेल्मेटची सक्ती वाहतूक नियमाबाबत जनजागृती मोहिमेवेळी त्या बोलत होत्या. राठोड पुढे म्हणाल्या, विना अपघात व सुरक्षिततेच्या दृष्टीने दुचाकी स्वरांना हेल्मेट सक्ती, चालक परवाना ,अठरा वर्षाच्या पुढील युवकांनाच वाहने द्यावीत, मद्यपान करून वाहने चालवु नयेत. पण या नियमांचे उल्लंघन होताना पावलोपावली दिसत आहे याची जनजागृती होणे काळाची गरज असल्याचे पुढे त्या म्हणाल्या दुचाकी स्वरांनी हेल्मेट परिधान केल्यास अपघातावर नियंत्रण ठेवता येते. सहाय्यक निरीक्षक अंबर शेट्टी, एन एच पुजारी, आर आर खोत, यांनी दुचाकी स्वरांना वाहतूक नियमांची माहिती दिली. यावेळी पोलीस कर्मचारी, वाळकी, पट्टणकुडी, नाइंग्लज, नवनीहाळ, कोठाळी, चिखलवाळ, खडकलाट येथील दुचाकी स्वार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या हेल्मेट जनजागृतीमुळे परिसरामध्ये खडकलाट पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक अनिता राठोड यांचे कौतुक होत असून नागरिकांनी थोडीशी सावधानता टाकल्यास अनेक अपघात टाळू शकतो.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!