आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

देवचंद कॉलेज मध्ये सस्टेनेबल ॲग्रीकल्चर या विषयावर एकदिवसीय परिषद संपन्न!

परिषदेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कृषी रसायने व कीड व्यवस्थापन आदी विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक एस.आर.यंकंची यांनी वृक्षाला जलार्पण करून केले!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (3)

कृषी रसायने व कीड व्यवस्थापन पदव्युत्तर विभाग देवचंद कॉलेज, अर्जुननगर येथे शाश्वत शेती या विषयावरती एक दिवसीय परिषद 28 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. परिषदेचा उद्देश सदर विद्यार्थी, विद्यार्थिनी, संशोधक, शास्त्रज्ञ यांच्या मध्ये सखोल चर्चा घडवून आणणे व संबंधित विषयावरती समाजामध्ये जनजागृती करणे हा होता. शाश्वतशेती परिषदेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कृषी रसायने व कीड व्यवस्थापन आदी विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक एस. आर. यंकंची यांनी वृक्षाला जलार्पण करून केले. उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणामध्ये पारंपारिक शेती पद्धती, त्याचे फायदे आणि कालांतरानुसार शेतीपीक पद्धती, त्याचे फायदे व पीक पद्धती मध्ये झालेले बदल, त्याचे फायदे आणि तोटे या विषयी सखोल माहिती दिली. दुसऱ्या महायुद्धानंतर अन्नधान्याचा तुटवडा असताना आपल्या देशामध्ये उत्क्रांतीची सुरुवात झाली. व कृषी रसायनांचा आणि कीटकनाशकांच्या वापराला सुरुवात झाली परंतु त्याच्या अतिरिक्त वापरामुळे माती, पाणी व पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. त्यामुळे शेती उत्पादना मध्ये घट होत आहे असे मत मांडले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्रीमती जी. डी. इंगळे होत्या. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्व व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सेंद्रिय शेतीचा उपयोग करावा असे सांगितले. सेंद्रिय शेती म्हणजेच शाश्वत शेती होय. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक व स्वागत प्रो. डॉ. पी. डी. शिरगावे, अधिविभाग प्रमुख, कृषीरसायने व कीडव्यवस्थापन, देवचंद कॉलेज, अर्जुननगर यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. अमृता गोंधळी यांनी केली तर आभार प्रा. किरण आबिटकर यांनी मानले.  

परिषदेच्या प्रथम सत्रा मध्ये डॉ. एस. बी. पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले व त्यांनी पारंपारिक ऊस शेती लागवड पद्धतीला छेद देऊन बियां पासून उसाची शेती करणे एक शाश्वत पद्धत या विषया वर बोलले. परिषदेच्या पहिल्या सत्राच्या दुसऱ्या व्याख्याना मध्ये प्रा. सी. एस. पाटील अधिविभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषीविद्यापीठ राहुरी, हे मधमाश्या आणि कीटकनाशक या विषयावर माहिती दिली तर दुपारच्या सत्रामध्ये माननीय प्राध्यापक शामराव जहागीरदार यांनी सोयाबीन पिकावरील रोगनियंत्रण याविषयावर व्याख्यान दिले.  

समारोप समारंभा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विद्यापीठ धारवाड येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बी. अरुणकुमार हे होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जी. डी. इंगळे होत्या. परिषद आयोजन करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई किरणभाई शाह तसेच उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह यांचे प्रोत्साहन लाभले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जी. डी. इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदी विभागातील प्रा. सोनाली कुंभार, प्रा. ओंकार कोष्टी, प्रा.अमृता गोंधळी, प्रा. किरण अबिटकर, दीपाली इंगवले, वैभव संघमित्र, दीपाली सुरवशे, रोहन सरनाईक अधि विभागातील शिक्षकेतर कर्मचारी रणजित कोळी, दयानंद अनुसे, राजश्री वायदंडे, राहुल वंदुरे, विकास कोरे, रोहित साठे, अभिजीत साबळे यांनी परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!