आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

वारकरी संप्रदायातील धर्मभास्कर मावळला!

सिमाभागातील वारकरी सांप्रदाय महासंघाचे अध्यक्ष वै.ह.भ.प.भाऊसाहेब पाटील महाराज!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (3)

जेवढी श्रद्धा धर्मशास्त्रांवर तेवढीच श्रद्धा गाथा, ज्ञानेश्वरी भागवत आदी संतवांङमयावर सुद्धा. याविरोधात किंवा संतनिदात्मक बोलणाऱ्या बुद्धीप्रामाण्य वाद्यांचा महाराजांना प्रचंड तिटकारा. एवढचं नाही तर आपल्या खास शैलीत त्यांचे खंडण करण्याची त्यांची असे. अधिकार वाणीतून बोलण्याची प्रचंड क्षमता , स्पष्टवक्तेपणा मिश्किलपणे बोलण्याची ‘लाघवता ‘असा अपुर्व संगम म्हणजे आदरणीय सहजानंद उर्फ वेदशास्त्र संपन्न, धर्मभास्कर, संतवाङमय उपासक सिमाभागातील वारकरी सांप्रदाय महासंघाचे अध्यक्ष वै.ह.भ.प.भाऊसाहेब पाटील महाराज

धर्मशास्त्रातील कोणत्याही शंका असोत अथवा एखाद्या कुट अभंगाविषयी चर्चा असो आदरणीय भाऊसाहेब महाराजांचं संतवाङमयावर प्रकाश टाकणारे विपुल लेखन संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या नाट प्रकरणावरील विठ्ठल आमुचे जीवन मुक्त चिंतन आहे.

का झाकलिया घटीचा दिवा l नेणो काय झाला केधवा l या रीती जो पांडवा l देह ठेवी ll . या न्यायाने आज सायंकाळी पाच वाजता आपला देह भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. महाराजांच्या जाण्यामुळे ज्ञानेश्वरी व गाथेचा ज्ञानकोश हरपला आहे.

वासांसि जीर्णानि यथा विहाय

नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।

तथा शरीराणि विहाय जीर्णा-

न्यन्यानि संयाति नवानि देही ।।२२।

*भगवद गीता अध्याय २/२२*

(जशी जुनी वस्त्रे त्यागून मनुष्य नवी वस्त्रे घेतो तसा जीवात्मा जुने शरीर त्यागून नवे शरीर घेत असतो ) अनेक वर्षाच्या अनंत प्रेमळ, गोड़ अशा स्मृती मागे ठेऊन शांतचित्ताचे अलौकिक दर्शन घडवून ह.भ.प.वै.भाऊसाहेब पाटील महाराज यांचा पुण्यात्मा 2 ऑक्टो . सायंकाळीं 05.00 वा.जीर्ण कुडी त्यागून अनंताकडे झेपावला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!