आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

आपला जिल्हा इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी!

व्ही.एस.एम अभियांत्रिकी प्रांगणात डॉ. प्रभाकर कोरे यांचा नागरी सत्कार सोहळा!

  1. Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (4) 

आपला देश सर्व व्यक्ती स्वयंपूर्ण होण्यासाठी कात टाकत असून लवकरच आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल घडलेला दिसून येईल त्यामध्ये सर्वात स्वयंपूर्ण हा आपला बळीराजा होणार असून भविष्यकाळातील अनेक तरतुदीनुसार शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावल्यास व त्याची क्रयशक्ती वाढल्यास बाजारपेठेत थोडे सुगीचे दिवस येतील. व इंधनाच्या बाबतीत विचार केल्यास येत्या काही वर्षात इंधन निर्मिती करणारा मुख्य घटक हा शेतकरीच असणार असून आपल्या बेळगाव जिल्ह्या सह कोल्हापूर हे जिल्हे ऊस उत्पादनात आघाडीवर असल्यामुळे येथे इथेनॉलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले असून वरील दोन्ही जिल्हे आता स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असून लवकरच आपल्याला त्याची फळे चाखायला मिळणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते निर्माण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

केएलईचे कार्याध्यक्षपद 40 वर्षे सांभाळत असल्याबद्दल डॉ. प्रभाकर कोरे यांचा सत्कार व सोमशेखर आर कोठेवाले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमबीए व एमसीएस साठी इमारतीचे उद्घाटन करून ते बोलत होते. शुक्रवार तारीख 4 रोजी व्हीएसएम अभियांत्रिकीच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी केंद्रीय आहार व इंधन मंत्री प्रल्हाद जोशी हे होते.

आपल्या मनोगतामध्ये जोशी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारत ही संकल्पना सध्या सत्यात उतरायची आहे. जगात भारत आर्थिक सत्तेत पाचव्या क्रमांकावर आला आहे लवकरच भारत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनेल कारण त्यासाठी लागणारी पायाभूत सुविधांची निर्मिती सज्ज होत असून आपल्या सरकारने इथेनॉल उत्पादन व वापराला प्राधान्य दिल्याने देशात क्रांतिकारक बदल दिसून येत असून बळीराजा सत्ता केंद्री आला आहे.

प्रभाकर कोरे म्हणाले मंत्री नितीन गडकरी यांनी अंकली गोटूर महामार्गासाठी 2800 कोटींचा निधी दिला आहे. अंकलीत दहा किलोमीटर उड्डाणपूल होणार असल्याने महापुराच्या काळातील  कायमची समस्या निकाली निघणार आहे.

कार्यक्रमास पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार शशिकला जोल्ले, प्रकाश हुक्केरी, आशाताई कोरे ,गणेश हुक्केरी, विठ्ठल हलगेकर, काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, लक्ष्मण चिंगळे, उत्तम पाटील, जगदीश कवडगीमठ, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संजय शिंत्रे यांनी आभार मानले. सहकाररत्न चंद्रकांत कोठेवाले यांनी स्वागत केले. तर माजी आमदार महंतेश कवडगीमठ यांनी प्रास्तावित केले.


शेतकरी आता अन्नदात्यासह ऊर्जादाताही होणार..

जोपर्यंत ग्रामीण शेती सुधारणा नाही तोपर्यंत देशातील चित्र बदलू शकणार नाही लवकरच इथेनॉलवर धावणारी वाहने बाजारात येणार आहेत. यामुळे इथेनॉलला प्रचंड मागणी राहील त्यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती आणखी वाढवावी ज्यामुळे ऊसाला अधिक भाव देणे शक्य होईल त्यातून शेतकऱ्याची सुबत्ता वाढेल आणि तो अन्नदात्यासह आता ऊर्जादाताही पुण्याच्या मार्गावर असल्याचे आश्वासक मत मंत्री गडकरी यांनी काल व्यक्त केल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.


छुपे विकासरत्न.. डॉ. प्रभाकर कोरे

 

राज्यासह केंद्रात देखील आपले सर्वांच्या बरोबर सलोख्याचे संबंध ठेवल्यामुळे व त्यांना सर्व राज्या संदर्भातील समस्या ज्ञात असल्यामुळे डॉ. प्रभाकर कोरे हे खरे छुपे विकासरत्न असल्याचे मत मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काढले. कारण बेळगाव जिल्ह्यातील कोणत्याही मोठ्या समस्या संदर्भात आज देखील सरकार दरबारी आपले वजन वापरून कोणताही बडेजाव न करता, कोणताही मोठा उद्घाटन समारंभ न करता आपल्या भागासाठी व राज्यासाठी अनेक योजना आणत असल्यामुळे आज व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचे प्रकर्षाने जाणवत होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!