आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीय

शेमनेवाडी येथे भर दुपारी विळयाने केला युवकाचा मर्डर!

सुनील चेतन खोत वय 47 राहणार शेमणेवाडी असे मृताचे नाव!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (5)

आज भर दुपारी तीनच्या सुमारास शेमनेवाडी येथील रहिवासी असलेला व नेज हद्दीमध्ये शेताकडे जात असता संशयित लोकांनी विळयाने वार करून एकाची जीवन यात्रा संपवली.

घटनास्थळावरून व नागरिकांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदलगा पोलीस स्टेशन हद्दीतील शेमनेवाडी गावातील रहिवासी सुनील चेतन खोत वय 47 राहणार नेज एरिया हद्दीतील शेतावर राहत होते. आज दुपारी तीनच्या दरम्यान भाऊबंदकीतून झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी सदलगा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. तक्रार देऊन घरी परतत असता शेतातील वाटेवर दबा धरून बसलेल्या दोन संशयित नातेवाईकांनी हातातील विळयाने वार करून त्याला गतप्राण केले. अशी सध्या तर माहिती प्राप्त झाली आहे.

घटनेची माहिती समजताच मंडळ पोलीस निरीक्षक बी.एस तलवार यांच्यासह सदलगा पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री शिवकुमार बिरादर व त्यांच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन दोन संशयित आरोपींना अटक केल्याची आता माहिती उपलब्ध झाली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करत आहेत. झालेल्या खुणाचे नेमके कारण अजून अस्पष्ट असून संपूर्ण पंचनामा झाल्यानंतर अधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!