आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

देवचंद मध्ये टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू निर्मिती व प्रदर्शन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी अर्जुननगर, (दि 02 सप्टेंबर,2024)

देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे महाराष्ट्र शासनाच्या विविध उपक्रमांतर्गत परिसर विकास समिती व महाविद्यालयातील इको क्लब यांच्यामार्फत टाकाऊतून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन कॉलेजच्या प्राचार्या प्रो. डॉ जी डी इंगळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपप्राचार्या सौ एस पी जाधव , पर्यवेक्षक डॉ.अशोक डोनर व निमंत्रक प्रा.अर्चना पाटील उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूतून कल्पकतेने सुंदर वस्तू बनवल्या होत्या त्यामध्ये प्लास्टिक, जुनी घड्याळे, जुनी कपडे ,लाकडी चमचे यापासून वस्तू आकर्षकपणे तयार करण्यात आल्या होत्या . पर्यावरण पूरक वस्तू बनवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून आला . फुलदाणी, पायपुसणी ,उशी, कापडी पिशव्या ,हात रुमाल, पर्स अशा जवळपास 50 प्रकारच्या विविध सुंदर वस्तू बनवण्यात आल्या होत्या. मधुरा कुंभार या विद्यार्थिनीने होलोग्रम ही वस्तू टाकाऊ पासून बनवलेली सुंदर वस्तू म्हणून विशेष गौरव करण्यात आला.

दरम्यान याप्रसंगी प्रा आर एस कुंभार यांनी ‘स्वच्छता ही सेवा-2024 ‘ अभियान अंतर्गत मा. गट शिक्षण अधिकारी पं. स. कागल यांच्या पत्रानुसार कनिष्ठ महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा व घोष वाक्य स्पर्धा घेतली. यामध्ये एकूण 13 पोस्टर व घोषवाक्य होती. पोस्टर स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धेचे आणि टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूच्या प्रदर्शनाचे माननीय प्राचार्या यांच्याकडून विशेष कौतुक करण्यात आले.

वरील उपक्रम व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ.तृप्तीभाभी शाह, संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच एन एस एस विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विष्णू पाटील, प्रा.कृष्णामाई कुंभार , प्रा.कल्पना पाटील , प्रा.शिवाजी कुंभार, प्रा. राणी सोकासने, प्रा. धनश्री पाटील, तानाजी लोहार व एन एस एस विभाग स्वयंसेवक व विद्यार्थी आदी घटकांचे सहकार्य लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!