आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे इंग्रजी विभागामार्फत दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन!

प्राचार्य प्रो. डॉ जी डी इंगळे अध्यक्षस्थानी होत्या!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (8)

देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे इंग्रजी विभागामार्फत दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ जी डी इंगळे अध्यक्षस्थानी होत्या. या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटक बीज भाषक म्हणून प्रा.डॉ प्रभंजन माने इंग्रजी विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे होते. ते म्हणाले की इंग्रजी भाषा समृद्ध करावयाची असेल शिक्षकांनी वेगवेगळ्या शिक्षण पद्धतींचा अवलंब केला पाहिजे तरच इंग्रजी भाषा अवगत करता येईल. या राष्ट्रीय परिषदेसाठी साधन व्यक्ती म्हणून डॉ. गिरीश पवार, डॉ. श्रीधर गोखले, डॉ.पृणिमा बागची, डॉ. राहुल काळे, श्री चिंतन सोनवणे लाभले. प्रत्येक साधन व्यक्तीने शिकवत असताना साहित्य व इंग्रजी भाषा अध्यापनातील विविध पद्धती आणि अध्ययन अध्यापनातील नवीन संकल्पना यावर विशेष भर दिला. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी शिकण्याची गोडी निर्माण होईल अशा तंत्रज्ञानाचा वापर करून इंग्रजी भाषा कशा पद्धतीने शिकविता येते याचे मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय परिषदेसाठी कर्नाटक महाराष्ट्र व तमिळनाडू या राज्यातून शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. प्रा .बी जी पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले तसेच डॉ. आनंदी कांबळे यांनी सह समन्वयक म्हणून काम पाहिले.

या परिषदेसाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ सौ. तृप्तीभाभी शाह व खजिनदार श्री सुबोधभाई शाह यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. ही परिषद यशस्वी होण्यासाठी आयक्यू एसी चे समन्वयक प्रो.डॉ पी. डी.शिरगावे इंग्रजी विभागातील प्रा. ज्योती बुवा, प्रा. स्मिता पाटील, प्रा. मनीषा हातगिणे प्रा दीपा मडिवाल आणि विनायक वरुटे यांनी विशेष प्रयत्न केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!