आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

कोल्हापूर विभागीय तायक्वांदो स्पर्धेत देवचंद महाविद्यालयाचे सुयश.!*

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (12)

डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज साळुंखे नगर कोल्हापूर येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय तायक्वांदो स्पर्धेत मुलींच्या 60 किलो वजनी गटात देवचंद महाविद्यालयाची खेळाडू कु. साक्षी सुरेश मेथे हिने रौप्यपदक पटकावले. जयसिंगपूर येथे होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी साक्षीची निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व घटकामार्फत तिचे कौतुक होत आहे.

विजयी खेळाडूंना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्ष डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, संस्थेचे खजिनदार  सुबोधभाई शाह. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ. जी. डी. इंगळे , उपप्राचार्य डॉ. पी.पी. शाह  यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. तसेच योद्धा तायक्वांदो अकॅडमीचे प्रशिक्षक श्री सुरज कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, प्रा. निरंजन जाधव जिमखाना कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!