आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

भारतीय उद्योग क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरवले!

उद्योगपती रतन नवल टाटा यांचे वृद्धापकाळाने निधन! ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (10)

मरावे परी कीर्तिरूपे उरावे या म्हणीचा आपल्या आयुष्यात प्रत्येक पावलागणिक प्रत्यय आणून देणारे भारतीय उद्योग जगतातील सर्वात ज्येष्ठ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्व, टाटा उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष रतन नवल टाटा (वय 86) यांचे काल रात्री मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. टाटा सन्स चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्धीला देऊन ही माहिती दिली आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

रतन टाटा गेले काही दिवस आजारी होते. काही दिवसांपूर्वी देखील त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आपण नियमित तपासण्या आणि चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल झाल्याचे स्पष्टीकरणही त्यांच्यातर्फे देण्यात आले होते. त्यामुळे त्यांची तब्येत व्यवस्थित असल्याचे मानले जात होते. मात्र ते समाधान सर्वांसाठी अल्पजीवीच ठरले. आज पुन्हा त्यांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची तब्येत सुधारावी म्हणून डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ते अयशस्वी ठरले आणि रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते.

जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेल्या टाटा उद्योग समूहास  रतन टाटा यांनी आज देशातील आणि जगातील अग्रगण्य उद्योगसमूह बनवले. अब्जावधी डॉलर मूल्य असलेल्या टाटा समूहाचे 21 वर्षाहून अधिक काळ अध्यक्ष म्हणून ते त्या पदावर होते. या काळात त्यांनी टाटा समूहातील सर्वच कंपन्यांना वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते.

1996 मध्ये त्यांनी टाटांची दूरसंचार कंपनी टाटा टेलीसर्वीसेस ची स्थापना केली. तर सन 2004 मध्ये आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस चा आयपीओ देखील त्यांनी बाजारात आणला.त्याला कैकपटीने प्रतिसाद मिळाला होता. 2012 मध्ये समूहाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर ते टाटा ग्रुपचे मानद अध्यक्ष म्हणून मार्गदर्शनाचे आणि देखरेखीचे काम करीत राहिले. अर्थात तरीही टाटा ग्रुपच्या कंपन्यांची घोडदौड तशीच सुरू राहीली.


व्यवसाया बरोबरच नितिमूल्य जपणारा परिवार म्हणजे टाटा उद्योग समूह …

व्यवसाय करताना म्हणजेच नफा मिळवतानाही नितिमूल्य, सामाजिक बांधिलकी व गुणवत्ता यांची कास न सोडण्याचे टाटा समूहाचे तत्व त्यांनीही शेवटपर्यंत पाळले होते. त्याची अनेक उदाहरणे समाज माध्यमांवरही वारंवार चर्चिली जात होती. 2008 मध्ये मुंबईवर कसाबने केलेल्या अतिरेकी हल्ल्यात टाटा ग्रुपच्या कुलाब्यातील ताजमहाल हॉटेलची मोठी हानी झाली होती. पण त्यावेळी देखील सामाजिक बांधिलकी जपत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसह परिसरातील लोकांच्या कुटुंबांची अनेक महिने जबाबदारी उचलत सामाजिक जाणीवेचे भान ठेवत नुकसानग्रस्त ताज हॉटेलची अगदी काही महिन्यांमध्ये पुनर्बांधणी करून ग्राहकांसाठी सज्ज केले. पण त्यांच्या कोणत्याही उद्योग समूहामध्ये पहिल्यांदा समाजहित त्यानंतर नफा हे सूत्र आजतागायत तहयात चालू आहे.


डिग्री पेक्षा अनुभवाला प्राधान्य देणारा परिवार…

असे म्हणतात की प्रत्येक माणसाला अनुभव नाही म्हणून नोकरी नसते आणि नोकरी नसल्यामुळे कामाचा अनुभव नसतो. पण टाटा उद्योग समूहाच्या ध्येय धोरणानुसार त्यांच्या उद्योग समूहातील सर्वोच्च स्थानी असणारा व्यक्ती हा कुठला उपरा व्यक्ती न घेता त्यांच्याच उद्योग समूहातील अगदी कर्मचारी किंवा मिस्त्री काम करणारा माणूस उद्योग समूहाचा कार्यकारी संचालक देखील बनू शकतो. हे टाटा उद्योग समूहाचे एक वेगळं पण असून त्यांनी डिग्री पेक्षा अनुभवाला प्राधान्य देणारे माणसे समाजामध्ये जपल्यामुळे, जरी जागतिक बाजारपेठेत त्यांच्या उद्योग समूहाने भांडवली दृष्ट्या अग्रक्रम मिळवला नसला तरी भारतीयांच्या मनातील त्यांचे अडळस्थान एवढ्या उंचीवर आहे कि ती उंची हिमालयाला देखील मागे टाकेल. एवढे नक्की..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!