ताज्या घडामोडी

तक्रार निवारणदिनी ६२ तक्रारी निकाली

कामशेत : कामशेत पोलिसांकडून तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दाखल झालेल्या ८८ तक्रारींपैकी ६२ तक्रारींमध्ये तडजोड करून त्वरित निकाली काढण्यात आल्या. 

पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार, गुरुवारी (दि.९) सकाळी १० वाजता कामशेत येथील गणेश मंगल कार्यालयात  तक्रार निवारण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कामशेत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारी संबंधित अर्जदार व गैरअर्जदार यांना समक्ष बोलावून त्यांचे तक्रारींचे निवारण करण्यात आले. यावेळी कामशेत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ८८ तक्रारींपैकी ६२ तक्रारी निकाली निघाल्या असून यावेळी कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्रुतगती महामार्गावरून चोरीला गेलेली एक कार देखील तक्रारदारास मिळवून दिली असल्याची माहिती कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!