ताज्या घडामोडी

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला बोगदा पाडून रिंगरोड होणार नाही – श्रीरंग बारणे यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रस्तावित केलेला रिंगरोड श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला बोगदा पाडून होणार नाही तर डोंगराच्या बाजूने हा रिंग रोड होईल. यासाठी सर्वे करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. मुंबईतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंगरोड बाबत बैठक झाली. या बैठकीत खासदार बारणे यांनी रिंगरोड श्री क्षेत्र भंडारा डोंगराला बोगदा पाडून जात असल्याचे नकाशा दाखवत आहे. डोंगराला बोगदा करण्यास वारकऱ्यांचा व संस्थांनचा तीव्र विरोध असल्याचा मुद्दा मांडला. वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन रिंग रोड डोंगराच्या बाजूने घ्यावा. रिंग रोडचा रेखांकनात बदल करावेत अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला तत्त्वतः मान्यता देऊन त्यानुसार सर्वे करण्याचे आदेश दिले.

या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते, संग्राम थोपटे, भीमराव तापकीर, संजय जगताप,अशोक पवार, एम एसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे आणि एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते. तर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांनी ऑनलाइन बैठकीला हजेरी लावली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!