ताज्या घडामोडी

तळेगावमध्ये आज भव्य कोविड लसीकरण अभियान

तळेगाव : येथे तळेगावच्या दाभाडे नगरपरिषद व तालुका आरोग्य विभाग मावळ यांच्या वतीने आज शुक्रवार (दि. 24 सप्टेंबर) रोजी सकाळी ८:०० ते सायं ५:०० वाजेपर्यंत भव्य कोविड लसीकरण अभियान आयोजित करण्यात आले आहे.या अभियानांतर्गत शहरातील विविध भागातील 19 केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.

 

लसीकरण अभियान पूर्णतः मोफत असून तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व प्रक्षिशीत कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व लसीकरण अभियान राबविले जाणार आहे.तरी सदर लसीकरणाचा पहिला अथवा दुसरा  डोस बाकी असणाऱ्या संबंधित सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तळेगाव नगरपरिषद व आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात  येत आहे

लसीकरणासाठी उपलब्ध केंद्र-

1) प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे
2) नथुभाऊ भेगडे पाटील शाळा क्र.1 मारुती मंदिर चौक
3) न.प.कन्याशाळा क्र.4, चावडी चौक
4) कैकाडी समाज मंदीर भेगडे तालिमच्या मागे
5) लायन्स क्लब, कडोलकर कॉलनी
6) वैशाली मंगल कार्यालय लिंब फाटा
7) गजानन महाराज मंदिर तुकाराम नगर
8) आरोग्यम मल्टिपेशालिस्ट क्लिनिक शांताई सिटी सेंटर
9)ढाकणे हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे
10) नागरे हॉस्पीटल
11) अथर्व हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे
12)लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्र.3 गवत बाजार- स्टेशन
13) सेवाधाम हॉस्पिटल
14)हरणेश्वर हॉस्पिटल
15) रिक्रिएशन हॉल, मायमर मेडीकल कॉलेज गेट जवळ
16)मायमर मेडीकल कॉलेज
17) संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र.6 (गुलाबी शाळा ) वतननगर
18) यशोधाम हॉल तपोधाम कॉलनी
19) युनिक हॉस्पिटल- तळेगाव- चाकण रोड

लसीकरणासाठी सूचना-
– लसीकरणासाठी येताना स्वतःचे आधार कार्ड सोबत आणावे
– लसीकरण साठी येताना नाश्ता/ जेवण करून यावे
– लसीकरण केंद्रावर एकाचवेळी गर्दी न करता आपल्या सेवेत असणाऱ्या लसीकरण स्टाफला सहकार्य करावे
– लस घेणेअगोदर स्वतःस सर्दी, खोकला, ताप अथवा अन्य काही त्रास असल्यास केंद्रावरील डॉक्टरांचा सल्ला घेउनच लस घ्यावी.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!