ताज्या घडामोडी
इंदोर एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले ; प्रवाशी सुखरूप
⊃
लोणावळा : इंदोर एक्सप्रेसचे दोन डबे आज सकाळी पावणे आठच्या सुमारास रुळावरून घसरली यामुळे काही काळ लोणावळा – पुणे लोकल सेवा विस्कळीत झाली होती.
सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नसून सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. रेल्वे प्रशासनाने युध्दपातळीवर गाडी रुळावर घेण्याचे काम सुरू केले. गाडी रुळावर आणून पुढे सोडण्यात आली. मात्र लोकल सेवा विस्कळीत झाल्याने कामासाठी निघालेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली.