ताज्या घडामोडी

सदापुरमध्ये दिडशे नागरिकांचे लसीकरण

कार्ला : येथील सदापुरमध्ये शासनाच्या वतीने व मळवली सदापुर ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून घेण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत दीडशे नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

अठरा वर्षापुढील व्यक्तींना कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी मोहीमेचा लाभ घेतला.

सुनील दळवी, गणेश ढाकोळ, पूजा खराडे, अशोक ढाकोळ, सुषमा ढाकोळ, संजीवनी ढाकोळ, पंढरीनाथ ढाकोळ, नाथा ढाकोळ, नितीन ढाकोळ, सुदर्शन ढाकोळ, गणपत गो-हे, विष्णू ढाकोळ, पंढरीनाथ खराडे, वैभव दळवी, सुरेश दळवी व ग्रामस्थांनी लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पडली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!