ताज्या घडामोडी

शिवशक्ती मित्रमंडळ व अनिकेत भेगडे मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान

रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असता तात्काळ रक्तदान करत जपले सामाजिक भान

तळेगाव : मावळ तालुक्यातील तळेगाव येथील डॉ. भाऊसाहेब सरदेसाई रुग्णालयामधील गरवारे रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. डॉ. विजयकुमार पवार यांनी याबाबत अनिकेत भेगडे यांना फोनव्दारे माहिती देत  रक्तदान करण्यासाठी आवाहन केले. जराही वेळ न घालवता रक्ताची निकड लक्षात घेत अनिकेत भेगडे यांनी रक्तदात्यांशी संपर्क साधून  रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे  आवाहन केले. या आवाहनाला साद देत शिवशक्ती मित्र मंडळ व अनिकेत भेगडे मित्र परिवाराच्या सदस्यांनी त्वरित येऊन रक्तदान केले.

फार कमी वेळा मध्ये मुबलक रक्तसाठा उपलब्ध करून दिल्यामुळे डॉ.विजय कुमार पवार यांनी अनिकेत भेगडे व सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

डॉ. विजयकुमार पवार यांनी सांगितले की , गरवारे ब्लडबँक मध्ये रक्ताचा तुटवडा होता रुग्णालयात असलेल्या व्यक्तींना अक्षरशः रक्त उपलब्ध नव्हते. परंतु अनिकेत भेगडे यांना एक फोन करताच त्यांनी एका तासाच्या आत सर्व मित्र परिवारास संपर्क साधून रक्त उपलब्ध केले. अगदी कमी वेळात केलेल्या मदतीने आज गरवारे ब्लड बँक मध्ये रक्त उपलब्ध झाले आहे. 23 रक्तदात्यानी रक्तदान केले. त्यांनी केलेल्या ह्या मोलाच्या रुग्ण सेवेचा मी आभार मानतो आणि भविष्यात पण असेच आम्हाला त्यांनी मदत करावी.

याप्रसंगी बोलताना अनिकेत भेगडे यांनी यशवंत नगर व तपोधम colony मधील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की रक्ताची वाढती कमतरता लक्षात घेता सर्वांनी रक्तदान करावे. कारण रक्तदान हे श्रेष्ठदान आहे व आपली सामाजिक बांधिलकी जपावी.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!