औंढोलीतील प्रगतीशील शेतकरी श्रीपती मांडेकर यांचे निधन
अकराव्याचे निमित्ताने प्रवचन व भजनाचे आयोजन
लोणावळा : औंढोलीतील प्रगतीशील शेतकरी श्रीपती भिमा मांडेकर (वय ७५ ) यांचे बुधवारी ता.१० रोजी अकस्मिकपणे पहाटे निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी , दोन विवाहित मुलगे ,एक विवाहित मुलगी, सुना , पुतने, जावई , नातवंडे असा परिवार आहे. प्रगतीशील शेतकरी व बांधकाम व्यवसायिक मधुकर श्रीपती मांडेकर आणि युवक कार्यकर्ते सदुभाऊ श्रीपती मांडेकर हे त्यांचे सुपुञ होत.
त्यांचे अकरावा विधीच्या कार्यक्रमानिमित्त ता.२० रोजी सकाळी ९ ते १० ह.भ.प.सौ.संगीताताई चोपडे (येनपुरे ) येलघोल यांची प्रवचन सेवा आहे. औंढोलीतील श्री शंकराच्या मंदिराजवळ हा कार्यक्रम होणार आहे.
या निमित्ताने ता.१७ रोजी सायंकाळी ७ ते ८ ह.भ.प.जालींदर महाराज वाजे (पाचाणे ) यांचे प्रवचन होईल. ता.१८ रोजी ह.भ.प.विष्णू महाराज खांडेभराड ( आळंदी ) यांचे प्रवचन होईल. तसेच ता.१९ रोजी सायंकाळी ७ ते ८ ह.भ.प.तुषारमहाराज दळवी (भाजे) यांचे प्रवचन होईल. राञी ९ नंतर सामुदायिक हरिजागर होईल असे शोकाकूल मांडेकर परिवार व सगेसोयरे आणि औंढोली ग्रामस्थ संयोजक मिञपरिवार यांनी सांगितले.