ताज्या घडामोडी

पिंपरी – चिंचवड पोलीस भरती परीक्षा 19 नोव्हेंबर रोजी

पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा

चिंचवड : पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयातर्गत 720 पोलीस शिपाई पदांसाठी पोलीस भरती लेखी परीक्षा 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेत होणार आहे.

लेखी परीक्षेकरता एकूण 1 लाख 89 हजार 732 उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत. पिंपरी चिंचवड, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर या शहरातील 444 विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल. 444 परीक्षा केंद्रांवर एकूण 7 हजार 384 परीक्षा हॉलमध्ये उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

या लेखी परीक्षेसाठी एकूण 12696 पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

परीक्षार्थी उमेदवारांसाठी देण्यात आलेल्या सूचना

1) प्रवेश पत्रावर नमूद केल्याप्रमाणे covid-19 यासाठी खबरदारी म्हणून उमेदवारांनी परीक्षा केंद्रात दिलेल्या वेळेत प्रवेश करावा.

2)उमेदवारांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करतेवेळी परिधान केलेल्या पोषाखा मध्ये हाफ बाह्यांचा शर्ट/ टी शर्ट/ टॉप परिधान करावा.

3)परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उमेदवारांनी चप्पल/ बूट/ सॅंडल हॉल बाहेर काढावेत.

4)परीक्षा केंद्रात प्रवेश करीत असताना उमेदवारांनी त्यांच्याकडे असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे मोबाईल/ स्मार्ट वॉच/ ब्लूटूथ उपकरणे अशा प्रकारच्या वस्तू परीक्षा केंद्रात नेण्यास प्रतिबंध आहे.

5)परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याची वेळ संपल्यावर परीक्षा केंद्रात उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.

6)Covid-19 च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी स्वयंघोषणापत्र/ वचनपत्र स्वहस्ताक्षरात लिहून द्यावे.

7)परीक्षेची पद्धत ओएमआरवर आधारित असल्याने योग्य पर्यायाचे वर्तुळ गडद करावे.

8)परीक्षेची वेळ संपल्यावर पर्यवेक्षकांनी सांगितल्यानंतरच उमेदवाराने जागा सोडावी.

9)उमेदवारांनी प्रवेश पत्रा बरोबरच शासनाने अदा केलेले वैध ओळखपत्राचा (फोटो आयडी) पुरावा (आधार कार्ड/ पॅन कार्ड /ड्रायव्हिंग लायसन/ मतदान ओळखपत्र /पासपोर्ट) सोबत आणले पाहिजे.

10) उमेदवारांनी साधे निळे /काळे बॉलपॉइंट पेन आणले पाहिजे.

11)परीक्षा संपल्यानंतर सर्व उमेदवारांनी प्रवेश पत्र पर्यवेक्षकांकडे परत करावेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!