ताज्या घडामोडी

लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष धिरूभाई कल्याणजी (टेलर) यांना अतुलनीय कार्याबद्दल 150 वा सन्मान

लोणावळा : लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष धिरूभाई कल्याणजी (टेलर) यांना अतुलनीय कार्याबद्दल 150 वा पुरस्कार मिळाला. सन्मानपञ, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

अमरदिप बालविकास फौडेशन व टी.एन.जी.क्रिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार धिरूभाई कल्याणजी (टेलर) यांना सपत्निक देण्यात आला.

हा समारंभ मुंबई मराठी पञकार संघ सी.एस.टी मुंबई येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रहास म्हाञे , राज्यमंञी दर्जा, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षा सुनिताताई शिंदे , कर्करोग शास्ञज्ञ डाॕ.अमजदखान पठाण , सिनेअभिनेते प्रदिप पटवर्धन , अभिनेञी प्रेमा किरण आदी मान्यवरांचे हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.

अभिनेते श्री.पटवर्धन यांचेहस्ते पुणेरी पगडी डाॕ.धिरूभाई कल्याणजी यांना घालण्यात आली. सन्मानचिन्ह व शाल व पुष्पगुच्छ सौ.ठाकरे व सौ.शिंदे यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी सन्माननीय अतिथी आसलेले धिरूभाई कल्याणजी यांनी साई भजन म्हटले व महात्मा गांधी यांनी गायलेले रघुपती राघव राजाराम ! पतीत पावन सिताराम ,! ! आणि वेष्णवजन तो तेणे कहीये रे पीड पराई जान रे ! ! ही भजने गावून सर्व श्रोत्यांना मंञमुग्ध केले. ! !

.कल्याणजी हे अनेक वर्षे समाजातील गरीब व गरजू महिला , विधवा भगिणी , तसेच मुलींना शिलाई काम व शिक्षण घेण्यासाठी मदत तसेच क्लास फी आदी मदत करत आहेत.तसेच बांधकाम साईटवरील मुले,मुली यांना शालेय साहित्य व खाऊ आदी देऊन शिक्षणाची गोडी लावत आहेत,त्यांचे या कार्यांची दखल घेवून आजपर्यंत १४९ पुरस्कार मिळाले आहेत.हा १५० वा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!