ताज्या घडामोडी

संतोष भेगडे, दिपाली हुलावळे यांचा सत्कार

तळेगाव दाभाडे: पारदर्शी कारभार,संघटनात्मक काम, आणि वैयक्तिक दांडगा संपर्क ही संतोष भेगडे आणि दिपाली हुलावळे यांची बलस्थाने आहेत.आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीए सदस्य पदाच्या निवडणुकीत
मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दैदिप्यमान विजय मिळवला आहे.या विजयाचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी तळेगाव दाभाडे येथे केले.

पीएमआरडीए निवडणुकीत सदस्य म्हणून मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार,तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रांतिक उपाध्यक्ष संतोष भेगडे व कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली हुलावळे हे निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्या हस्ते करण्यात आला.

राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या निवासस्थानीहा छोटेखानी समारंभ झाला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशु संवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर,रा. काँ. ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष सुभाष जाधव,माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ चौधरी, कृष्णा कारके ,सुरेश धोत्रे, उद्योजक सुधाकर शेळके,माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे, ॲड. मनोहर दाभाडे, रामभाऊ गवारे,नंदकुमार कोतुळकर,दिलीप खळदे, सुर्यकांत काळोखे, ॲड.नंदकुमार काळोखे, सुदर्शन खांडगे, अशोक भेगडे, बाबुलाल नालबंद, अरुण काळोखे, छबुराव भेगडे,शोभा बबनराव भेगडे, मनोहर दाभाडे, अशोक म्हाळसकर, उत्तमशेठ ओसवाल,कौस्तुभ भेगडे, तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापतीजे. आर. भालेराव, किशोर राजस,अंकुश आंबेकर, अशोक काकडे, दिलीप कुल, दिलीप राजगुरव, दौलत भेगडे , प्रताप भेगडे आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!