ताज्या घडामोडी

तळेगावच्या माजी लायन अध्यक्षांचा सत्कार समारंभ संपन्न

तळेगाव : पन्नास वर्षाची दैदीप्यमान परंपरा असलेल्या तळेगावच्या माजी लायन अध्यक्षांच्या सत्कार समारंभ नुकताच मुंबई पुणे हम रस्त्यावर असलेल्या भंडारी विला येथे पार पडला.

सुरुवात विद्यमान अध्यक्ष दीपक बाळसराफ यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर मागील मिटिंगचा अहवाल आणि क्लबची सांपत्तिक स्थिती याविषयी लायन् सेक्रेटरी लायन गौरव शहा आणि खजिनदार लायन राजेंद्र झोरे यांनी दिल्यानंतर मुख्य सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

दिवंगत माजी लायन अध्यक्षांना श्रद्धांजली दिल्यानंतर एकूण 24 माजि लायन अध्यक्षांना फेटे बांधून त्यांना सन्मानपूर्वक आसनस्थ करण्यात आलं.लायन दीपक बाळसराफ यांनी आपल्या स्वतःच्या मनोगतात या अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रात विलक्षण उंचीवर असलेल्या सर्व माजी अध्यक्षांचा सत्कार करण्याच मला भाग्य लाभल म्हणून मी स्वतःला खरोखरच भाग्यवान समजतो असे उद्गागार काढले.

आपल्या अध्यक्षीय काळात लायन डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी  देहूरोड ते खंडाळा आणि नाणे मावळ, अंदर मावळ,पवन मावळ या संपूर्ण मावळचा” मावळ दर्शन” हा ग्रंथ तयार करताना अनेक माणस आपल्याला भेटलीत आपण नेहमीच पुस्तक तर वाचतोच पण मी या काळात माणसं सुद्धा वाचायला शिकलो आपल्या शेरोशायरी आणि खुसखुशीत शैलीत विविध स्वभावाच्या माणसांचं दर्शन डॉक्टर भंडारी यांनी घडवलं.

ॲड. श्रीराम कुबेर यांनीसुद्धा व्यवस्थापन कस असाव? कार्यक्रम कसा राबवावा? याची कार्यशाळा आम्ही आमच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अनुभवली हे प्रामाणिकपणे सभेला सांगितलं.लायन संदीप काकडे यांनी ग्रामीण भागाच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि त्याप्रमाणे त्याच्या अडचणी आम्ही वृक्षारोपण, रोजगार हमी,लोकशिक्षण यातून दूर करण्याचा प्रयत्न केला.

लायन शैलेश शहा यांनी आपल्या तळेगावला अत्याधुनिक हेल्थ क्लबची निर्मिती आपल्या प्रकल्प अधिकारी या नात्याने तळेगावसाठी केली याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे विदीत केल. लायन भरत पोद्दार यांनी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत निराश न होता प्रत्येकाने सातत्यानं आपल्या ध्येयाप्रत पोहोचावं ही शिकवण मला अध्यक्ष असताना मिळाली असं आवर्जून नमूद केलं.

शेवटी माजी प्रांतपाल लायन डॉ. दीपक भाई शहा यांनी मुंबईच्या विविध क्लबच्या आर्थिक मदतीतून गेली 45 वर्ष नेत्र शिबिराच्या नावाने ओळखला जाणारा लायन्स क्लब तळेगाव हा ज्यांच्या नेतृत्वाने तळेगावला सुरू झाला त्या लायन सी एम शहा सरांच स्वागत आणि यथोचित सन्मान केला. त्याबरोबरच स्थानिक विविध समाज उपयोगी उपक्रमा बरोबरच कायमस्वरूपी प्रकल्प या 85 सक्षम लायन्स सभासदांनी हाती घेऊन कार्यरत असाव असा संदेश आपल्या मनोगत व्यक्त केला.

प्रांताला- सन 2021- 22 यासाठी- डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून प्रशांतभाई शहा यांच नाव लायन शैलेशभाई शहा यांनी सुचवलं.याबरोबरच त्यांनी लायन प्रशांतभाईची लायन प्रवासातील पूर्ण कारकीर्द उभी केली.लायन महेशभाई शहा, लायन सुरेश जाधव या दोघांनीही लायन शैलेश भाईंच्या सूचनेला अनुमोदन दिल. आपल्या अभ्यासपूर्ण सूत्रसंचालनाने लायन अनिता बाळसराफ आणि लायन राधेशाम भंडारी यांनी शेरोशायरी ने या कार्यक्रमाला रंगत आणली.

त्यानंतर लायन राधेशाम भंडारी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यानंतर लायन ब्रिजेंद्र किल्लेवाला यांनी स्पॉन्सर केलेल्या सुग्रास भोजनाने या समारंभाची सांगता झाली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!