ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीत वाढ ; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

चिंचवड :औद्योगिक नगरी म्हणून आशिया खंडात परिचित असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात सध्या गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढू लागली आहे.यामुळे पिंपरी – चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील महिन्यापासून खुनाचा घटना सातत्याने घडत आहेत.अनेक नवनवीन पध्दतीने गुन्हा करण्याची शक्कल लढवली जात आहे.

 

विशेषतःवाढदिवसाचे औचित्य साधून अनेक तरुण मुले एकत्र येेेतात. त्यामध्ये सराईत गुन्हेगार असलेले आढळले असे होत नाही .मग पार्टी, मग भांडणे आणि खून असे सूत्र निर्माण झाले आहे.दोन दिवसांपूर्वी चिंचवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत अभिजित पवार नावाच्या तरुणाचा मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत सराईत गुन्हेगाराने खून केला. त्यावेळी जवळपास ७ ते ८ जण पार्टीला हजर होते.

सध्या पिंपरी – चिंचवड शहरात पोलिसांची गस्त कमी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.अनेक गल्लीबोळात टूक्कार पोरांचा भरणा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे.पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी जसे अवैध धंदे बंद करण्यासाठी जोमाने प्रयत्न केले त्याचप्रमाणे आता पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कडक पावले उचलणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.प्रत्येक पोलिस स्टेशन च्या हद्दीत सकाळ संध्याकाळी गस्त सुरू केली पाहिजे.त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आता कडक धोरण राबविले तरच गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी मदत होईल असे सर्व सामान्य जनतेला वाटत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!