ताज्या घडामोडी

धक्कादायक ; डोक्यात वरवंटा घालून मुलाने केली वडिलांची हत्या

राजगुरुनगर : वडिलांनी स्वतःच्या लग्नसाठी वधू – वर सूचक केंद्रात नाव नोंदणी केल्याच्या रागातून मुलाने वरवंटा डोक्यात घालून वडिलांची हत्या केल्याची घटना राजगुरूनगर येथे घडली आहे.

शेखर शंकर बो-हाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार महेश शंकर रामभाऊ बो-हाडे यांनी स्वतःच्या लग्नासाठी वधू – वर सूचक मंडळात पैसे भरून नाव नोंदणी केली होती. याचा राग अनावर झाल्याने मुलगा शेखर बो-हाडे यांने सुरी घेऊन वडिलांच्या गळा कापण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरीला धार नसल्याने गळा कापला गेला नाही. घरात असलेल्या दगडी वरवंट्याने  शेखर यांने शंकर बो-हाडे यांच्या तोंडावर व डोक्यात घाव घालून खून केला.

पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव करत आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!