ताज्या घडामोडी

आजपासून देशभरात दिला जाणार लसीचा बूस्टर डोस

 

दिल्ली : कोरोनाचा प्रसार देशभरात वाढत आहे. या दरम्यान आज पासून संपूर्ण देशभरात लसीचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात होणार आहे.

आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कस आणि 60 पेक्षा जास्त वय असलेल्या आजारी लोकांना हा डोस देण्यात येणार आहे. कोरोनाचा दुसरा डोस घेऊन 9 महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे त्या सर्व नागरिकांसाठी बूस्टर डोसचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार अंदाजे 1.05 कोटी आरोग्य कर्मचारी, 1.9 कोटी फ्रन्टलाइन कर्मचारी आणि साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 2. 75 कोटी लोकांना या कार्यक्रमांतर्गत प्रतिबंधात्मक बूस्टर डोस दिले जातील. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी ट्विट करत एक कोटीहून अधिक फ्रन्टलाइन कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना डोससाठी एसएमएस पाठविण्यात आल्याचे सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!