ताज्या घडामोडी

रोटरी क्लब व सेवा धाम ट्रस्ट ग्रंथालयाच्या वतीने ध्वजारोहण व सन्मान समारंभ

तळेगाव : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व सन्मान समारंभ पार पडला.

यावेळी ध्वजारोहण मा.नगराध्यक्ष सुरेश धोत्रे व सीआरपीएफ 242 बटालियन चे डेप्युटी कमांडंट महेंद्र सर यांच्या हस्ते करण्यात आले.

डेप्युटी कमांडंट महेंद्र सर यांनी यावेळी रोटरी सिटीच्या सामाजिक कामाचे कौतुक केले व कोविड विषयी नागरिकांनी स्वतः काळजी घ्यावी असे आवाहन केले.

मा. नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी ग्रंथालयाची माहिती दिली व सर्वांना आजीवन सभासद होण्याचे आवाहन केले. तसेच ग्रंथालयासाठी सीसीटीव्ही व कम्प्यूटरची आवश्यकता आहे. संपूर्ण पुस्तके ऑनलाइन करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे सदर कार्यक्रमाच्या वेळी आकाशात 73 कबुतरे सोडण्यात आली.

कार्यक्रमाला मा. नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, सेवा धाम ट्रस्ट व ग्रंथालयाचे कैलास काळे, रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष विकास काळोखे, दिलीप पाटेल, हरिश्चंद्र गडसिंग, सुरेश झेंडे, संजय मेहता ,प्रदीप टेकवडे, तानाजी मराठे, शरयू देवळे, रेश्मा फडतरे, सेवा धाम ट्रस्ट ग्रंथालयाचे डॉ. मिलिंद निकम, निवृत्ती फलके, अनिल बांदल व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!