ताज्या घडामोडी

लोणावळ्यात काँग्रेसचे भाजपच्या विरोधात लाक्षणिक उपोषण

लोणावळा : लोणावळ्यात काँग्रेस आय कमिटीच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे विरोधात  केंद्रातर्फे महाराष्ट्र राज्याचा केलेला अपमान आणि केंद्रशासीत संस्थांचा केलेला गैरवापर यांचे विरोधात दिवसभर लाक्षणिक उपोषण भाजी मार्केट चौकात करण्यात आले.

यावेळी लोणावळा शहर अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड , काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कविश्वर यांनी , तसेच सेवादलाचे श्री बाबुभाई शेख , युवक अध्यक्ष श्री .दळवी यांनी भाजपच्या धोरणांचा निषेध केला. केंद्रशासीत संस्थांचा , ईडीचा गैरवापर करण्यात येत आसल्याने हे लाक्षणिक उपोषण करण्यात आल्याचे भाषणातून सांगण्यात आले.

यावेळी माजी उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल , माजी नगराध्यक्ष मारूती तिकोणे , शहर उपाध्यक्ष रवि सलोजा , कार्यकर्ते मारूती राक्षे, पदाधिकारी सुबोध खंडेलवाल , सत्तार शेख , माजी नगरसेवक महम्मद मणियार, आमोल ओंबळे , आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!