ताज्या घडामोडी

श्री राजाधर्मवीर संभाजी प्रतिष्ठान आणि धर्मवीर संभाजी नागरी पत संस्था यांच्या वतीने कार्य गौरव पुरस्कार प्रदान.

श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान आणि धर्मवीर संभाजी नागरी पत संस्था यांच्या वतीने कार्य गौरव पुरस्कार देण्यात आला.⋅ याप्रसंगी बोलताना प्रतिष्ठान चे माजी अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या उद्दिष्टाने प्रतिष्ठानची स्थापना झाली, समाजकारण करताना पैशाची चणचण भासू लागली म्हणून पतसंस्थे ची स्थापना करण्यात आली व त्यातील धर्मदाय निधी मधून प्रतिष्ठान समाज कार्य करत होते .संस्थापक खंडुजी टकले म्हणाले पतसंस्था काढणे त्याकाळी अवघड होते आम्ही पाच पाच दहा हजार रुपये दैनंदिन प्रतिनिधीला मिळण्यासाठी भरपूर प्रयत्न केले प्रयत्न करताना समोर अडचणीचे डोंगर उभे राहतात, पण आपण आपले प्रयत्न सोडायचे नसतात आम्हाला प्रतिष्ठानच्या माध्यमातून ॲम्बुलन्स आणताना साडेतीन वर्ष लागली पण आम्ही प्रयत्न सोडले नाही यावेळी आजी-माजी संचालक दैनंदिन प्रतिनिधी कर्मचारी वर्ग यांना कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भाजपच्या महिला अध्यक्ष सायली बोत्रे यांनी प्रतिष्ठान आणि पतसंस्थेच्या कामाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय शेटे हे होते सूत्रसंचालन सौ शीतल शेटे यांनी केले व आभार संतोष परदेशी यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!