ताज्या घडामोडी

ओबीसी आरक्षण पूर्ववत करताना बलुतेदारांना संधीचे प्रमाण वाढवण्याची बारा बलुतेदार विकास संघाची मागणी-रामदास सूर्यवंशी(प्रदेशाध्यक्ष)

ओबीसीत बलुतेदारांना ९% स्वतंत्र आरक्षण तसेच ओबीसींना राज्य सरकारने ५००० कोटीचे बजेट देत त्यामधून १५०० कोटी बलुतेदारांना द्यावे.

ओबीसी आरक्षण पूर्ववत करताना बलुतेदारांना संधीचे प्रमाण वाढवण्याची बारा बलुतेदार विकास संघाची मागणी-रामदास सूर्यवंशी(प्रदेशाध्यक्ष)

कोरोनामुळे आधीच अडचणीत आलेला ओबीसी व बलुतेदार समाज सध्या महागाईने बेजार झालेला आहे.यातच कोर्टाच्या एका निर्णयामुळे ओबीसी आरक्षणही गेले.त्यामुळे ओबीसी व बलुतेदारांच्या जीवनात अंधकारमय स्थिती निर्माण झालेली आहे हा अंधकार ओबीसींना तेजोमय करण्यासाठी ओबीसी समर्पित आयोगाने प्रयत्न करण्याची मागणी बारा बलुतेदार संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बाठीया यांच्याकडे शिष्ठमंडळासह झालेल्या बैठकीत केली.पुणे मनपा आयुक्त सौरभ राव यांनाही निवेदन देण्यात आले.
यावेळी मा.आ.बाळासाहेब शिवरकर,बारा बलुतेदार विकास संघाचे प्रदेश सचिव राजेंद्र पंडित,उस्तवप्रमुख रोहित यवतकर,शहराध्यक्ष राजेश भोसले,काॅंगेस पक्षाचे शहर सरचिटणीस राजाभाऊ मगर,परिट समाज आरक्षण समितीचे उपाध्यक्ष सुनील शिंदे,बलुतेदार प्रदेश कार्यकारणी सदस्य सुजीत मगर,कसबा अध्यक्ष विनायक गायकवाड,हडपसर अध्यक्ष हनुमंत यादव,सहसचिव प्रशांत झणकर,नामदेव समाजोन्नती परिषदेचे प्रदेश सचिव अजय फुटाणे,उपाध्यक्ष संजय नेवासकर,अॅड्.ज्ञानेश्वर पाटसकर,लाॅंन्ड्री संघटनेचे सुनील पवार,महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष महेश सांगळे,विशाल साळुंके परिट समाजाचे सतिश राऊत,सुतार समाजाचे यशवंत महामुनी यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी परिट समाज,शिंपी समाज,नाभिक समाज यांच्या वरिल संस्था व पदाधिकारी यांनी निवेदन देत आपआपली सामाजिक व ओबीसी आरक्षण विषयक भूमिका आयोगासमोर तळमळीने अभ्यासपूर्ण मांडली
नामदेव समाजोन्नती परिषदेचे सचिव अजय फुटाणे व संजय नेवासकर यांनी इमेपेरीअल डाटा देत शिंपी समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे याची मागणी केली. काॅंग्रेस पक्षशहर सरचिटणीस राजाभाऊ मगर यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका न घेण्याची आग्रही मागणी केली।क्षत्रीय परिट महासंघाने बलुतेदार महामंडळाची मागणी करीत त्याला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याची मागणी केली.नाभिक महामंडळातर्फे पुणे शहराध्यक्ष महेश सांगळे यांनी नाभिक समाजासाठी केश शिल्पी महामंडळ लवकर सुरू करण्याची मागणी केली.राष्ट्रवादी ओबीसी पुणे जिल्हा आघाडीवतीने हनुमंत यादव यांनी मूळ ओबीसींना संधी देण्याची मागणी केली.
सूर्यवंशी पुढे म्हणाले की,ओबीसी आरक्षण वाचवताना लवकरात लवकर इम्पेरीअल डाटा कोर्टात द्यावा जातनिहाय जनगणनेची शिफारस करावी.ओबीसीत बलुतेदारांना ९% स्वतंत्र आरक्षण तसेच ओबीसींना राज्य सरकारने ५००० कोटीचे बजेट देत त्यामधून १५०० कोटी बलुतेदारांना द्यावे व बलुतेदारांना संधीचे प्रमाण शिक्षण व नोकरीतही वाढावे कुणबी मराठा आरक्षण ओबीसीतून काढावे त्यांना स्वंतंत्र आरक्षण खूप गरिबांना वेगळे अभ्यासाने द्यावे आदी मागण्यासह विविध मागण्यावर चर्चा यावेळी झाली याबाबत लक्ष घालत न्याय देण्याचे आश्वासन जयंतकुमार बाठीया यांनी दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!