ताज्या घडामोडी

सृजनालयातील मुलींना दिवाळी फराळाचे किट व कपडे वाटप..

अजित फाऊंडेशनच्या बार्शीतील (कोरफळे) स्नेहग्रामची मुले पुण्यात आली होती. अशा वंचित व उपेक्षित मुलींची दिवाळी गोड करण्यासाठी रोटरी क्लब पुढे सरसावला.त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली.

सृजनालयातील मुलींना दिवाळी फराळाचे किट व कपडे वाटप.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचा उपक्रम

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, २ नोव्हेंबर.

दिवाळी म्हंटले की दीपोत्सव, आनंद, नवीन खरेदी, फराळ अन् फटाक्यांची आतिषबाजी…पाडव्याला सुवासिक तेल, सुगंधी उटणे लावून अभ्यंग स्नान, नवे कपडे परिधान कडून दिवाळी फराळावर यथेच्छ ताव मारण्याचा हा उत्सव. पण अनेक गरीब मुलं या आनंदापासून वंचित असतात.

अशाच मुलांसाठी दिवाळी एक सण न राहता सामाजिक उत्सव व्हावा, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीने अजित फाऊंडेशनच्या सृजनालयातील मुलींना दिवाळीनिमित्त फराळ, फटाके व नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. वर्षभर समाजातील गरजवंत निराधारांना आधार देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी विविध उपक्रम राबवते. समाज घडवण्यासाठी आवश्यक वैचारिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम क्लबच्या वतीने आयोजित करण्यात येतात. या पैकीच एक म्हणजे सामाजिक दिवाळी उत्सव.! यावेळी समाजातील एकल पालक कैद्यांच्या मुली, भीक्षेकरी व विधिग्रस्त महिलांच्या मुली अजित फाऊंडेशन संस्थेस दाखल आहेत. संस्थेचे सृजनालय व स्नेहग्राम दोंन्ही प्रकल्प निवासी असून लोकाश्रीत आहेत.

यंदा दिवाळीसाठी अजित फाऊंडेशनच्या बार्शीतील (कोरफळे) स्नेहग्रामची मुले पुण्यात आली होती. अशा वंचित व उपेक्षित मुलींची दिवाळी गोड करण्यासाठी रोटरी क्लब पुढे सरसावला.त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली. कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष रो दीपक फल्ले,रो किरण ओसवाल,रो संतोष शेळके,रो हरिचंद्र गडसिंग, रो दिलीप पारेख,रो प्रदीप टेकवडे, रो भगवान शिंदे,रो प्रशांत ताय,रो तानाजी मराठे,रामभाऊ जगदाळे, महेश निंबाळकर, विनया निंबाळकर, गिरीश तापकीर मंडळी तसेच स्नेहग्राम व सृजनालयातील मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होती.

बाल सरपंच व नगराध्यक्षांचा केला सन्मान:* स्नेहग्राम व सृजनालयातील बाल सरपंच, उपसरपंच, बाल नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष अनुक्रमे शिवम शिंदे, विनायक पवार, भारती पवार व कल्याणी काळे यांची निवड झाल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने पुस्तके भेट देऊन सन्मान केला.

प्रामाणिक काम व निःस्वार्थ सेवा करणाऱ्या सामाजिक संस्था या आमचे आप्तेष्ट आहेत. अशांच्या पाठीशी खंबीर उभं राहणं, हा स्थायीभाव आहे. त्याचं भावनेतून रोटरीने सृजनालयातील मुलींना दिवाळीची भेट दिली असल्याचे मत माजी आरटीओ आयुक्त रो हरिचंद्र गडसिंग यांनी व्यक्त केले. याप्रसंगी रो दिलीप पारेख ,रो दीपक फल्ले, रो हर्षल पंडित यांची मनोगते झाली. या कार्यक्रमाचे प्रास्तविक महेश निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन किरण ओसवाल आणि आभार गिरीश तापकीर यांनी मानले.
.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!