ताज्या घडामोडी

कुऱ्हाडीने घाव घालून बापानेच केला मुलाचा खून.. 

बापानेच मुलाचा खून केला व नंतर मी माझ्याच पोराला मारले म्हणून बाप घराबाहेर आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

 गुन्हेवार्ता .. सुदुंबरे,मावळ..कुऱ्हाडीने घाव घालून बापानेच केला मुलाचा खून..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २ नोव्हेंबर. 

कुऱ्हाडीने घाव घालून बापानेच मुलाचा खून केला व नंतर मी माझ्याच पोराला मारले म्हणून बाप घराबाहेर आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना काल मंगळवारी,  रोजी दुपारी  सुदुंबरे, बोरकरवाडी (ता. मावळ) येथे घडली.

समीर बाळू बोरकर (वय ३४, रा. बोरकरवाडी, सुदुंबरे, ता. मावळ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी बाळू बबन बोरकर (वय ५५) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी समीर याच्या भावाच्या पत्नीने (वय २८) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू हा शेती आणि पशुपालन करत होता. मुलगा समीर हा नियमीत काम करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याच्या वागणूक आणि सवयींमुळे त्याचे लग्न जमत नसल्याने वडील बाळू आणि समीर यांचा वारंवार वाद होत असे. बाळू यांची थोरली सून फिर्यादी पूनम मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घरात स्वयंपाक करीत होत्या. त्यावेळी दिर समीर हा टीव्ही पाहत हॉलमध्ये झोपला होता. यावेळी आरोपी बाळू बोरकर अचानक घरी आले व त्यांनी कुऱ्हाड  समीरच्या डोक्यात मारुन त्याचा खून केला. बाळू रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन ‘मी समीरला मारले’ असे म्हणत बाहेर आल्यानंतर पूनम यांनी हॉलमध्ये जाऊन पाहिले असता समीर हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

दरम्यान, या खुनाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार पांडे यांनी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन केले. आरोपी बाळू बोरकर याला ताब्यात घेत अटक करून वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार पांडे करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!