ताज्या घडामोडी

तळेगाव-चाकण रोडवर, रात्री  २.३० वा. येथील ऐश्वर्या हॉटेल समोर तरुणाला बेदम मारहाण करून लुटले.

तळेगाव-चाकण रोडवर, रात्री  २.३० वा. येथील ऐश्वर्या हॉटेल समोर तरुणाला बेदम मारहाण करून लुटले.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, १४ जानेवारी.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे हद्दीतील चाकण रोडवरील ऐश्वर्या हॉटेलजवळ आरोपी धोत्रे, गलीयल, धायभर या तिघांनी मिळून फिर्यादी यादव यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या ताब्यातील रोख रक्कम  जबरदस्तीने हिसकावून नेली. या आरोपींनी सुरुवातीला तळेगाव स्टेशन चौकातून एका तरुणास मारहाण करून त्याची दुचाकी चोरली. त्यानंतर तळेगाव-चाकण रोडवर  कंटेनर अडवून चालकांना लुटले. या  गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून,

याबाबत रवींद्र चंद्रभान यादव (वय 29, ड्रायवर, रा. संतोष ट्रान्सपोर्ट कंपनी, कातवी, ता. मावळ ) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली असून याप्रकरणी हेमंत बाळू धोत्रे (वय20, रा. सिध्दार्थनगर, तळेगाव दाभाडे), सुमित राकेश गलीयल(वय 20, रा. सिध्दार्थनगर, तळेगाव), अनिकेत दादाभाऊ धायभर(वय 22, रा. अंबिका पार्क, वतननगर, तळेगाव दाभाडे ता.मावळ, , जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इंगळे हे करीत आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!