कृषीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अथणी शुगर भुदरगडची 3100 प्रमाणे ऊस बिले जमा- श्रीनिवास पाटील

30 नोव्हेंबर पर्यंतची ऊस बिले जमा!

Kiran G. Patil M.No.884357516

अथणी शुगर भुदरगड युनिटची चालू हंगामातील 30 नोव्हेंबर पर्यंतची ऊस बिले प्रति मे.टन 3100 प्रमाणे संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले व 30 नोव्हेंबर पर्यंतची तोडणी वाहतुकीची बिले सुद्धा जमा केलेची माहिती कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री श्रीनिवास पाटील यांनी दिली.

यावर्षीचा गळीत हंगाम उत्तमरित्या सुरू असून त्यासाठी कारखान्याने योग्य नियोजन केले असल्याने सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा ऊस वेळेत कारखान्याला यावा यासाठी शेती विभागामार्फत तोडणी वाहतुकीचे योग्य असे नियोजन केले आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे अथणी शुगर भुदरगड युनिट या कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत अदा करण्याची परंपरा कायम ठेवली असून एफआरपी पेक्षा ज्यादा रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रुपये 3100 प्रमाणे ऊस बिले जमा करून, शेतकरी हाच कारखान्याचा केंद्रबिंदू असून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी कारखाना नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याची माहिती व्यवस्थापना मार्फत देण्यात आली. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व ऊस आमच्या कारखान्याला गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्रीनिवास पाटील यांनी पुढे केले.

यावेळी चीफ इंजिनियर सुरेश शिंगटे, डे.चीफ केमिस्ट प्रकाश हेदु्रे,शेती अधिकारी राजाराम आमते.कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब देसाई,डे.चि अंकौटट जमिर मकानदार, शेतकरी व तोडणी वाहतूक कत्राटदार व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!