क्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसर

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन

मराठा मंडळ बेळगाऺवच्या अध्यक्ष श्रीमती राजश्री जी नागराजू (हलगेकर) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजन!

Kiran G.Patil M.No.8884357516

दिनांक 6 /12 /2012 रोजी मराठा मंडळ बेळगाव च्या अध्यक्ष श्रीमती राजश्री जी नागराजू (हलगेकर) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मॉडर्न इंग्लिश स्कूल निपाणी येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन झाले.

या कार्यक्रम प्रसंगी निपाणी शैक्षणिक विभागाचे इसीओ श्री महालिंगेश् जे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद‌ शाळेच्या प्राचार्या सौ स्नेहा आर घाटगे यांनी भूषविले.

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी पिरॅमिड नृत्याचे सादरीकरण केले . वैजयंती साळुंखे व प्रतीक्षा पाटील या विद्यार्थ्यांनी लाठी काठी आणि दानपट्टा यांचे सादरीकरण केले. प्राप्ती पाटील तिने भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण केले .शाळेचे क्रीडा शिक्षक श्री सुकुमार गोरवाडे  यांनी शपथ ग्रहण विधी दिला .

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री महालिंगेश् जे  यांनी शालेय जीवना मधील खेळाचे महत्व सांगितले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ स्नेहा आर घाटगे म्हणाल्या की शालेय जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने खेळामध्ये हिरीरीने भाग घेतला पाहिजे जेणेकरून अंगी खेळाची वृत्ती बाळगली जाईल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सई चव्हाण व तेजस्विनी घोरपडे या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन मानसी कांबळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे हातभार लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!