ताज्या घडामोडीनिपाणी परिसर

शिरगुपी येथे “नायब सुभेदार” प्रकाश हजारे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न!

भारत मातेची 26 वर्षे 24 दिवस सेवा करून निवृत्ती स्वीकारली! गावकरी व परिवारातर्फे सत्काराचे आयोजन!

Kiran G. Patil M.No.8884357516

कुटुंबापासून कित्येक वर्षे बाहेर राहून भारत मातेची सेवा करत अखंड सेवा बजावणारे जर कोणते क्षेत्र असेल तर ते भारतीय सैन्यदल होय. अगदी भरती झालेल्या दिवसापासून सेवानिवृत्ती पर्यंत त्यांचे आयुष्य खडतर प्रवासानी भरलेले असते. असेच लान्स नायक या पदापासून अगदी (MACP) नायब सुभेदार पदापर्यंत दरमजल भरारी घेत तब्बल 26 वर्षे 24 दिवस भारत मातेची सेवा करत शिरगुपीचे सुपुत्र श्री प्रकाश मारुती हजारे हे कॉर्पस ऑफ सिग्नल, आर्मी मधुन हवलदार (MACP) नायब सुभेदार या पदावरून सेवा निवृत्त झाले.

आज सायंकाळी  त्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. प्रारंभी सर्व गावकऱ्यांनी मिळून नागरी सत्कार करून गौरवण्यात आले. त्यानंतर गावातील अनेक प्रतिष्ठित लोकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. श्री हजारे हे अगदी लहानपणा पासूनच सैन्य दलात जाण्यासाठी आवड असणारे व्यक्तिमत्त्व होते, त्यांचा स्वभाव अतिशय मृदू असुन त्यांचे उर्वरित सेवा निवृत्तीचे आयुष्य सुखकर जाण्यासाठी गावकऱ्यांनी हित चिंतले.

यावेळी बाळासाहेब हजारे, धोंडीराम हजारे ,संतोष हजारे, पंकज देसाई, नियाज मुल्ला, प्रकाश गुरव, सचिन नार्वेकर, अमर मारुती पोवार ,लक्ष्मण गुरव, मैनुद्दीन मुल्ला, उदय देसाई ,अमोल देसाई ,पिंटू पाटील, सुरज देसाई, संदिप हजारे, जयवंत कुंभार, बाळासाहेब रक्ताडे, दिनकर पोवार, शंकर पोवार,नवनाथ हंचनाळे, बाबासाहेब हंचनाळे, यांच्यासह गावातील सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी, स्वसहाय्य संघाच्या महिला प्रतिनिधी, प्रतिष्ठित गावकरी, आजी माजी सैनिक, नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!