क्राईमताज्या घडामोडीनिपाणी परिसर

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात गंभीर झालेल्या वृद्धाचा मृत्यू!

शंकर सत्याप्पा हेळवी (वय 70, रा. जोडकुरळी, ता. चिक्कोडी) असे त्यांचे नाव आहे.!

Kiran G.Patil M NO.8884357516

निपाणी येथील पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी बसस्थानकावर रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला भरधाव मोटारीने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी कोल्हापुरात दाखल केले असता रविवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. शंकर सत्याप्पा हेळवी (वय 70, रा. जोडकुरळी, ता. चिक्कोडी) असे त्यांचे नाव आहे. अपघात रविवारी (ता. 10) सकाळी घडला. याबाबतची नोंद बसवेश्वर चौक पोलिसांत झाली आहे.

याबाबत माहिती अशी  शंकर हेळवी यांचा पारंपरिक हेळवी व्यावसायिक असून, ते कुटुंबीयांसमवेत सुगी मागण्यासाठी यमगर्णी येथे आले होते. यमगर्णीतून महामार्ग रस्ता ओलांडून पलीकडे जात असताना निपाणीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीचा चालक विनायक चौगुले (रा. चिमगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) याचा वाहनावरील ताबा सुटल्याने हेळवी यांना जोराची धडक बसली. रस्त्यावर आपटल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापुरात सरकारी रुग्णालयात दाखल केले; पण उपचारादरम्यान त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला. पोलिसांनी मोटारीसह चालकाला ताब्यात घेतले आहे. बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पोवार अधिक तपास करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!