शिवाजी विद्यापीठाचा 60 वा दीक्षांत समारंभ येत्या सोमवारी!
महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली!
शिवाजी विद्यापीठाचा साठावा दीक्षांत समारंभ येत्या सोमवारी 18 डिसेंबर रोजी महामहीम राज्यपाल डॉ. रमेश बैस यांच्या विशेष अध्यक्षतेखाली होणार आहे.
कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचा साठावा दीक्षांत समारंभ राजमाता जिजाऊ साहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये असून माननीय राज्यपाल डॉ. रमेश बैस यांच्या उपस्थिती मध्ये विद्यापीठातील स्नातकाना दीक्षा दिली जाणार असून समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून एस एस मंथा हे उपस्थित राहणार असून विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थिती दर्शवणार असून कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के प्रमोद पाटील कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तसेच सर्व विद्यापीठ परिषदेचे पदाधिकारी, संचालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कुलसचिव प्रमोद पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.