क्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसर

मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे!

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रकाश एम हेरेकर माजी प्राचार्य देवचंद महाविद्यालय अर्जुननगर हे होते!

Kiran G Patil M.No.8884357516

येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल[Modern English School] निपाणी येथे वार्षिक स्नेहसंमेलन वसुधैव कुटुंबकम जल्लोषात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमास बेळगांव मराठा मंडळ संचालितच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती राजश्री जी नागराजू, श्री नागराजू यादव  यांनी अध्यक्षस्थान भूषविले. तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ प्रकाश एम हेरेकर  माजी प्राचार्य देवचंद कॉलेज अर्जुननगर, डॉ. आनंदमूर्ती वि. कुलकर्णी‌ प्राचार्य बीएड कॉलेज नंदी एक्संबा , शाळेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर् दिलीप पठाडे  निपाणीतील पत्रकार मंडळी, शाळेचे शुभचिंतक, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. हेरेकर[Dr Prakash Herekar]  म्हणाले की मराठा मंडळीने केलेली प्रगती ही अद्वितीय आहे. डॉ. कुलकर्णी म्हणाले की मॉडर्न इंग्लिश स्कूल निपाणी येथे शालेय अभ्यासक्रमा बरोबरच इतर कलागुणांना म्हणजेच मुलांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो जेणेकरून भविष्यात त्यांची खरी प्रगती होते.

या कार्यक्रमांमध्ये गेल्या वर्षी झालेल्या दहावीच्या वार्षिक परीक्षेमधील अव्वल नंबर पटकावलेल्या मुलांचा गौरव करण्यात आला. अमृता बी माने , प्रतीक बी पाटील ,कार्तिक पी पाटील, सोनाली पाटील, शिवम कश्यप , अंकिता हेरवाडे,अनिरुद्ध कदम ,अपेक्षा औडनकर, भक्ती चव्हाण आणि वैभवी पाटील, स्नेहा पटोले व श्रावणी कुलकर्णी या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच शाळेत यंदाच्या वर्षातील आदर्श विद्यार्थी म्हणून संकल्प मन्नोळी या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून अदिती रावण या विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला. तसेच यु केजी या वर्गातून सुद्धा आदर्श विद्यार्थी म्हणून आलोक पवार व आदर्श विद्यार्थिनी म्हणून प्रियाजनी सटाले या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात शाळेच्या प्ले ग्रुप नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या नृत्य अविष्कारांनी पालकांचे मनोरंजन केले. प्रत्येक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी समाजाला एक  प्रबोधनात्मक संदेश दिला .मोठ्या संख्येने पालकांनी यास दाद दिली.

शाळेचे व सर्व विद्यार्थ्यांचे सामाजिक स्तरातून सर्वत्र कौतुक केले जात आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या प्राचार्या सौ स्नेहा आर घाटगे  सर्व शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!