कृषीताज्या घडामोडीनिपाणी परिसर

(Mushroom) देवचंद मध्ये अळंबी उत्पादनाबद्दल एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुण्या जी.आय. बागेवाडी महावि‌द्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. शशिलेखा पाटील होत्या!

Kiran G.Patil M.No.8884357516


देवचंद महावि‌द्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागामध्ये अळंबी उत्पादन पद्धती या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.

या एकदिवसीय कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुण्या जी. आय. बागेवाडी महावि‌द्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. शशिलेखा पाटील यांनी वि‌द्यार्थ्यांना अळंबी उत्पादनाबद्दल सखोल माहिती पुरविली. अळंबीचे विविध प्रकार व त्यांच्या विविध प्रजातींच्या बद्दल माहिती सांगितली तसेच आपण अळंबीचा खाद्यपदार्था मध्ये कसा वापर करू शकतो व त्याच्यामध्ये आढळून येणारे प्रथिने, लोह, फायबर व जीवनसत्वे हे कश्याप्रकारे आपल्याला उपयुक्त ठरु शकतात याबद्दल माहिती सांगितली. अळंबी मध्ये आढळून येणारे औषधी गुणधर्म. ज्याच्यामुळे अळंबी ‘अँटिव्हायरस’ व ‘ॲटी कॅन्सरवर’ उपाय कारक आहेत. व अशा अळंबी उत्पादना बद्दल माहिती सांगितली. तसेच हा व्यवसाय नवीन पिढीसाठी एक आर्थिक स्त्रोत म्हणून कसे उपयोगाला येईल व आजच्या तरुण पिढीसाठी ही एक उत्तम संधी कशी ठरू शकेल याबद्दल वि‌द्यार्थ्यांना माहिती पुरवण्यात आली.

अळंबी(mushroom )उत्पादन करण्यासाठीचे प्रात्यक्षिक बी. के कॉलेज चिकोडी वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. सुजाता शिरगावे व देवचंद महावि‌द्यालयातील कृषी रसायने व कीड व्यवस्थापन विभागाच्या प्रा. किरण आबिटकर यांनी केले . प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एल पी लंका हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. पी. डी. शिरगावे यांनी केले. प्रास्ताविका मध्ये देवचंद महावि‌द्यालय व वनस्पतीशास्त्र विभागा बद्दलची माहिती दिली . तसेच ही कार्यशाळा आयोजन करण्या मागचा उद्देश स्पष्ट केला.

कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. आशिषभाई शाह, उपाध्यक्षा मा. डॉ.सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार सुबोधभाई शाह यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच देवचंद महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी. डी. इंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .सदर कार्यक्रमास बी. के. कॉलेज चिकोडी येथील प्रा. पुराणिक व जी. आय. बागेवाडी कॉलेज निपाणी येथील प्रा . शिल्पा सुन्नाळ या उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीएससी भाग तीन ची विद्यार्थिनी लक्ष्मी जाधव हिने केले .पाहुण्यांची ओळख प्रा.सोनाली कुंभार यांनी करून दिली व प्रा. डॉ. वर्षा खुडे यांनी आभार मानले . या उपक्रमास बी. के. कॉलेज चिकोडी जी. आय. बागेवाडी कॉलेज निपाणी व देवचंद कॉलेज अर्जुननगर येथून जवळपास 140 विद्यार्थी उपस्थित राहिले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अमृता गोंधळी, प्रा. रवीना जिरगे, राजश्री वायदंडे, संतोष सुतार, रणजीत कोळी, राहुल वंदूरे यांनी परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!